पेठ- विविध प्रकारच्या गुणदर्शक सौंदर्यस्पर्धा हया केवळ शहरी स्पर्धकांची मक्तेदारी होऊ नये यामध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील मुलीनांही व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या श्रावणक्विन स्पर्धत चतुर्थी पठाडे हिने प्रथम क्र मांक मिळवला. डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे श्रावण क्वीन २०१९ स्पर्धा संपन्न झाली. डांग सेवा मंडळच्या अध्यक्ष हेमलता बिडकर यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले.यास्पर्धेत एकूण ३७ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. चतुर्थी चंद्रशेखर पठाडे हिची श्रावण क्वोन म्हणून प्रथम क्र मांकाने निवड झाली, श्रावणी गोरख रहाणे द्वितीय तर सलोनी परदेशी हिने तृतीय क्र मांक मिळवला. याप्रसंगी गौरी पाठक, सचिव अॅड.मृणाल जोशी उपस्थित होते. प्राचार्य कल्पना शिरोरे यांनी प्रास्ताविक केले. गौरी पाठक, पी. एस.अिहरे , व्ही. सी.आचार्य यांनी परिक्षण केले. एस.सी.पवार यांनी सुत्रसंचलन तर एस.के. गरु ड यांनी आभार मानले.
चतुर्थी पठाडे ठरली पेठची श्रावणक्विन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 2:29 PM