वटार : जिवाचे रान करून कांदा पिकाचे विक्र मी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना सध्या कोसळलेल्या कांद्याच्या दराने निराश केले आहे. जवळपास अर्धा कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.भाववाढीची आस लागलेल्या शेतकºयांचा कांदा चाळीतच सडायला लागला आहे. त्यामुळे कांदा विकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकºयांसमोर राहिलेला नाही. चाळीमध्ये चार ते पाच महिन्यांपूर्वी साठवलेला कांदा आता मोठ्याा प्रमाणात खराब होऊ लागला आहे. त्यामुळे कांदा विक्र ीस अनेक शेतकरी पसंती देत आहेत. त्यामुळे कांदा भाववाढ व्हावी, अशी मनोमन इच्छा आहे. मात्र सध्या तरी कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.कसमादे परिसरातील शेतकरी दरवर्षी दर्जेदार कांदा पीक काढतात. त्यात पाण्याचे योग्य नियोजन करत विक्र मी उत्पन्न मिळवतात. यावर्षीही शेतकºयांना मनाप्रमाणे उत्पन्न मिळाले. परंतु आता भाववाढ होत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. बºयाचशा शेतकºयांकडे खरीप पिकाचे पेरण्या, बियाणे, खते, मशागत आदी खर्च करण्यासाठी कांदा सोडून दुसरे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीकच नव्हते. परंतु कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकºयांनी कर्ज काढून, सोने तारण ठेवून आपली गरज भागविण्याचा प्रयत्न केला.पण साठवून ठेवलेला अर्धा कांदा सडला तर आहे त्याला प्रती ६०० ते ७०० रु पये दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
चाळीत सडला कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:33 PM
जिवाचे रान करून कांदा पिकाचे विक्र मी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना सध्या कोसळलेल्या कांद्याच्या दराने निराश केले आहे. जवळपास अर्धा कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : भाव वाढत नसल्याने नुकसान