पेठ : आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी नागरिकांना सवलतीच्या दरात दिले जाणारे स्वस्त धान्य दुकानातील धान्य घोटाळे राज्यभर गाजत असताना अजूनही या धान्याचा काळा बाजार सुरुच असल्याचे पेठ तालुक्यातील एका घटनेवरून दिसून आले.तालुक्यातील कहांडोळपाडा येथील प्रगती पुरु ष बचतगटाच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातील १ क्विंटल गहू व ५० किलो तादुळ काळ्या बाजारात विक्र ी करण्याच्या उद्देशाने आणलेला माल कहांडोळपाडा ग्रामस्थांच्या जागरु कतेमुळे फसला असुन वाहनचालकाने धान्याचे तीन कट्टे वाहनातुन फेकुन पलायन केले मात्र एक कट्ट्यासह वाहन परागंदा झाले. फेकुन देण्यात आलेल्या मालाचा पुरवठा निरीक्षक सी एम जाधव यानी पंचनामा करु न गोदामात जमा केला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कहांडोळपाडा येथील प्रगती पुरु ष बचतगटाच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाचा मार्च महिन्यात वाटप करण्यासाठी शासकीय गोदामातुन अंत्योदय योजनेचा गहु १५ क्वि. १२ कि.ग्रँ., तांदुळ १० क्वि. ८ कि.ग्रँ., अन्नपुर्णा योजनेचा गहु ६ क्वि. ९३ कि.ग्रँ. तादुळ ४ क्वि. ६२ कि. ग्रँ. यासह अंगणवाडीसाठी लागणारा गहू २ क्वि. ४ कि. ग्रँ. तांदुळ १ क्वि. ५७ कि.ग्रँ द्वारवितरणाचे वाहनाने दि.४ मार्च रोजी पाठविण्यात आला त्याचे वाटप सुरु असुन शिधा पत्रिका धारकांना अवघा १७ कि.ग्रँ. गहू व १३ कि.ग्रँ तादुळ शिधा पत्रिका धारकास देण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.आज दुपारी तेथील खाजगी प्रवासी वाहतुक करणा-या वाहनातून प्रत्येकी दोन-दोन कट्टे गहु तांदुळ खुल्या बाजारात विक्र ी साठी घेऊन निघाले मात्र याच वाहनातून काही ग्रामस्थही प्रवास करत असल्याने त्यांनी कट्ट्यातील धान्य सरकारी असल्याचे ओळखले नंतर ते त्यांच्या पाठलागावर राहिले मात्र वाहन चालकास संशय आल्याने त्या चार पैकी तीन कट्टे उतरवुन वाहनासह चालकाने पलायन केले.सदरची माहिती ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक जाधव यांना दिली.त्यांनी शहरातील खाजगी दुकानासमोरील धान्यचा रितसर पंचनामा करु न धान्याचे कट्टे गोदामात जमा कले आहेत.अधिक तपास पुरवठा निरीक्षक करत असून दोषीवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. (वार्ताहर )
स्वस्त धान्य काळ्याबाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2016 12:07 AM