नाशिक : गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे फॅड आणण्यात आले होते. आता बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थर्माकॉलच्या मखरांची आणि खुल्या थर्माकॉलची बाजारपेठेत विक्री होताना दिसून येत आहे. मात्र, महापालिकेच्या संबधित विभागांकडून कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून प्लास्टिक बंदी पुन्हा एकदा कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गतवर्षी कोणतीही पूर्वसूचना न देता प्लास्टिक बंदी जाहीर केली होती. हा निर्णय झाल्यानंतर पुढील काही महिन्यात जोरदार अंमलबजावणी करण्यात आली. यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रदूषण महामंडळाने कारवाईचा धडाका लावत अनेक दुकानदारांना ५ हजारांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व थर्माकॉलचा समावेश होता. परंतु गणेशोत्सव अगदीच तोंडावर आल्याने व सर्व वस्तू अधीच तयार झाल्या होत्या.त्यामुळे सरकारने नमती भूमिका घेत गणेशोत्सवातील प्लास्टिकच्या काही वस्तूंना परवानगी दिल्याने व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात मखर विकले होते. परंतु, आता प्लास्टिक बंदी होवून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात थर्मार्काकॉल दिसणारही नाही अशी पर्यावरण प्रेमींची अपेक्षा होती. पण तसे न होता यावर्षी खुल्या थर्माकॉलसह काही ठिकाणी तयार मखरही विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या दिवसांपासून नाशिक महापालिकेने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजाणीसाठी काही व्यावसायिकांवर कारवाई केलेली असतानाही थर्माकॉलची विक्री कशी होते? असा सवाल उपस्थित होत आहे. सजावटीच्या साहित्यात प्लास्टीक वस्तूराज्यात पास्टिक बंदी लागू असताना ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मखर सजावटीच्या विविध साहित्यात प्लास्टीकच्या वस्तू असल्याचे दिसून येत असून थर्माकॉलचीही खुलेआम विक्री आणि वाहतूक होत आहे. त्याचप्रमाणे थर्माकॉलसह प्लास्टीकच्या पाना फुलांच्या वेली, सजावटीच्या कमानी, कृत्रिम लॉन, नैर्सगिक सजावटीचा सेट, फुलदाण्या व कृत्रिम फुले यासह अन्य वस्तूंंचाही यात समावेश असून याची आवकही मोठ्या प्रमाणात असताना नगरपालिका किंवा प्रदूषण मंडळाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
बंदी असताना थर्माकॉल, प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 6:58 PM
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे फॅड आणण्यात आले होते. आता बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थर्माकॉलच्या मखरांची आणि खुल्या थर्माकॉलची बाजारपेठेत विक्री होताना दिसून येत आहे. मात्र, महापालिकेच्या संबधित विभागांकडून कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून प्लास्टिक बंदी पुन्हा एकदा कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देनाशिकमध्ये प्लास्टीक बंदीला हरताळ थर्माकॉल, प्लास्टीक साहित्याची विक्री