नाशिक : कीर्ती कलामंदिर या कथक नृत्य संस्थेतर्फे आयोजित पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवाच्या पहिल्या पुष्पात नृत्यांगना स्वरा साठे हिने छलिया छेडे बासुरीया या ठुमरीवर अफलातून नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तीन दिवस रंगणाऱ्या या कार्यक्र मात यंदा बालमहोत्सव होणार आहे.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या बालमहोत्सवात नववीतील स्वरा साठे हिने सात मात्रांच्या रूपक तालातील पारंपरिक कथक नृत्याची प्रस्तुती केली. त्यानंतर स्वरा साठे हिने कृष्णाने वाजवलेल्या मुरलीच्या स्वरांनी स्वत:मध्ये हरवलेली आणि त्यावर लटका राग व्यक्त करणाºया ठुमरीत सुंदर पदन्यासाने रंग भरले. कार्यक्र माच्या दुसºया सत्रात गुरू चेतन सरैया यांच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यानंतर तीनताल, ठुमरी आणि सरगमच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंग भरले.दरम्यान, या कार्यक्र मांतर्गत स्वरा साठे हिला सुभाष दसककर (संवादिनी), बल्लाळ चव्हाण (तबला), ईश्वरी दसककर (गायन), सुरश्री दसककर (सिंथेसायझर) आणि रेखा नाडगौडा (पढंत) यांनी साथसंगत केली. या गोपीकृष्ण महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी कीर्ती कलामंदीरतर्फे सुरू असलेल्या या महोत्सवामुळे नवीन पिढीवर रचनात्मक आणि सकारात्मक परिणाम होणार असल्याचे सांगितले. यावेळी स्नेहा दातार, रेखा नाडगौडा, आदिती नाडगौडा - पानसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन पियू आरोळे यांनी केले.
छलिया छेडे बासुरीया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:59 AM