ओझर टाउनशिप : एचएएल कंपनी व एअरफोर्समधील मोठ्या अधिकाऱ्यांशी आमची ओळख आहे, तुमच्या मुलांना एचएएल किंवा एअरफोर्समध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून वेळोवेळी एकूण २१ लाख १५ हजार रु पये घेऊन बनावट कॉललेटर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी १० जणांविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुधाकर भागाजी घुगे (कही, ता. नांदगाव) यांनी नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सप्टेंबर २०१५ ते १३ आॅक्टोबर २०१८ या काळात शोभा शेजवळ (रा. मनमाड), अमोल भालेराव (रा. चाटोरी, ता. निफाड), रोशन किसन खालकर (रा. बेरवाडी, ता. निफाड), सुनील दराडे (रा. चापडगाव, ता. निफाड), दीपक गेणू मोकळ (रा. मनमाड), शोभा लाड व योगेश लाड, अज्जूभाई ऊर्फ जानी अक्तराब्दुल गफर शेख, मोहन मिश्रा, के. आर. चौधरी (सर्व, रा.ओझर) यांनी मुलांना नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे.एचएएलमध्ये ओळख असल्याचा दावाआमची एचएएलसह एअरफोर्समधील मोठ्या अधिकाºयांशी ओळख आहे तसेच शोभा लाड या एचएएलमध्ये मोठ्या अधिकारी असून, तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो असे सांगून माझ्यासह साक्षीदाराकडून वेळोवेळी एकूण २१ लाख १५ हजार रु पये घेऊन एचएएल कंपनी व एअरफोर्सचे बनावट कॉललेटर देऊन नोकरी लावून न देता आमच्या पैशांचा अपहार करून आमची फसवणूक केली आहे. हा सर्व प्रकार ओझर टाउनशिप येथे घडला आहे. घुगे यांनी शनिवारी नोंदविलेल्या तक्रारीनुसार ओझर पोलिसांनी संशयित दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे हे करीत आहेत.
नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:34 AM
एचएएल कंपनी व एअरफोर्समधील मोठ्या अधिकाऱ्यांशी आमची ओळख आहे, तुमच्या मुलांना एचएएल किंवा एअरफोर्समध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून वेळोवेळी एकूण २१ लाख १५ हजार रु पये घेऊन बनावट कॉललेटर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी १० जणांविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देओझर टाउनशिप येथील घटना : दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल