पंचवटी : येथील रविवार कारंजा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी मज्जाव करीत असले तरी काही बेशिस्त रिक्षाचालक बिनधास्तपणे रस्त्यातच रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारीदेखील या रिक्षाचालकांपुढे हतबल झाले आहेत. अशोकस्तंभाकडून रविवार कारंजा व रविवार कारंजाकडून मालेगाव स्टॅण्ड तसेच पंचवटी कारंजाकडे दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येणाºया वाहनधारकांना तर या रिक्षाचालकांचा मोठा अडथळा होत असतो. भररस्त्यात रिक्षाचालक रिक्षा उभ्या करून प्रवासी भरण्याचे काम करत असल्याने रविवार कारंजाकडून वळण घेणारे वाहनधारक विशेषत: एसटीचालक यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद होतात. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी या रिक्षाचालकांना टोकले तर हे रिक्षाचालक तेवढ्या वेळेपुरता रिक्षा तेथून काढून पुढे नेतात व पुन्हा चांदवडकर लेनमधील रस्त्याने वळणावर रिक्षा आणून उभ्या करतात तर काही रिक्षाचालकांनी आता तर थेट रविवार कारंजा पुलाजवळ असलेल्या सुंदरनारायण मंदिरासमोर रिक्षा थांबा केल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.अपघात होण्याची शक्यतारविवार कारंजा परिसरात रिक्षाचालक, तसेच परिसरातील विविध दुकानांत किराणामाल खाली करण्यासाठी येणाºया चारचाकी वाहनांमुळे वाहतूककोंडी निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी वाहतूक शाखेकडे करूनही गंभीर दखल घेतली जात नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
रविवार कारंजाला रिक्षांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:29 AM