येवला : राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने पारित केलेल्या अधिसूचनेनुसार डाळी, खाद्यतेल व खाद्यतेलबिया यांवर साठामर्यादा लागू करण्यात आली आहे. या आदेशाला अनुसरून जीवनाश्यक वस्तूंच्या काळाबाजारास आळा घालण्यासाठी येथील तहसीलदार शरद मंडलिक, पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे यांनी येवला शहर व तालुक्यातील घाऊक व किरकोळ व्यापार करणाऱ्या दुकानांची व गुदामांची अचानक तपासणी केली. यावेळी सर्व प्रकारच्या डाळी, खाद्यतेल व खाद्यतेलबियांच्या व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात दुकानदारांनी जीवनावश्यक मालाची जास्त प्रमाणात साठेबाजी केली किंवा कसे याची तहसीलदार मंडलिक यांनी सखोल पाहणी केली. या तपासणीमध्ये कोणत्याही दुकानात मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळला नसल्याचे पाहणीनंतर सांगण्यात आले. (वार्ताहर)
येवल्यात खाद्यतेल, डाळ दुकानांची तहसीलदारांकडून तपासणी
By admin | Published: October 20, 2015 10:48 PM