नाशिक : गुन्हेगारांच्या शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘तपास यंत्रणा पथका’चे (इन्व्हेस्टिगेशन सेल) कामकाज येत्या १ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी शनिवारी (दि़२७) पत्रकार परिषदेत दिली़ नाशिक परिक्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली़ राज्यात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १२ टक्के असून, यामध्ये वाढ करण्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा (इन्व्हेस्टिगेशन सेल) तयार करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढले होते़ त्यानुसार राज्यभरातील सर्व पोलीस ठाणी तसेच आयुक्तालय या ठिकाणी ही यंत्रणा तयार केली जाणार आहे़ या पथकाकडे केवळ गुन्'ाचे तपास करण्याचे काम असणार असून, यामुळे गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात वाढ होणार आहे़ या तपासी पथकांचे कामकाज येत्या १ जुलैपासून सुरू होणार आहे़ नाशिक परिक्षेत्रातील (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर) कायदा सुव्यवस्थेचा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आढावा घेतला़ त्यामध्ये संबंधित जिल्'ात घडलेले गुन्हे, उकल झालेल्या गुन्'ांची संख्या, कामकाजातील अडचणींबाबत माहिती घेतली़ तसेच खून, दरोडे, चेनस्नॅचिंग, महिला अत्याचाराचे प्रलंबित गुन्हे, आरोपींना अटक करण्याची सूचना दिली़ याबरोबरच मालवण (मालाड) परिसरातील विषारी दारू दुर्घटनेनंतर संपूर्ण परिक्षेत्रात अवैध धंदे तसेच दारू दुकानांवर छापा टाकण्याचे आदेश दिले आहेत़
‘तपासी पथकां’चे कामकाज जुलैपासून
By admin | Published: June 28, 2015 1:31 AM