सातपूर :- राज्य सरकारने मास्कचे दर निश्चित केले असून वाढीव दराने विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानाची तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीआय) दिले आहेत.कोरोना काळात रिटेलर मेडिकल दुकानादारांनी स्वतः जीव धोक्यात घालून अविरत रुग्णांना औषध सेवा दिली.या सहा महिन्याच्या काळात आधी सॅनिटायझर व आता मास्क तपासणी करून रिटेलरला वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे मेडिकल दुकानाची तपासणी करण्याचे आदेश मागे घ्यावा या आशयाचे निवेदन रिटेल केमिस्ट अशोसीएसनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन अधिकारी चंद्रकांत मोरे यांना देण्यात आले आहे.$$ किराणा,कापड दुकानासह रस्त्यावर ही काही विक्रेते सॅनिटायझर व मास्क विकत आहे.तपासणी मात्र रिटेरलचीच होत आहे.ही तपासणी करतांना नाहक त्रास देण्यात येत आहे.शासनाच्या आदेशानुसार एफडीआय ने रिटेरलच्या दुकानात तपासणी करावी.अधिकाऱ्यांनी दुकानदारांना त्रास देऊ नये.एकीकडे रिटेरलच्या दुकानाची तपासणी होत असताना कापड दुकान किराणा दुकान रस्त्यावर खुले आम रस्त्यावर सॅनिटायझर व मास्क विकले जात आहे.मात्र त्यावर कारवाई होत नाही. पूर्वग्रहदूषित आदेश काढत कारवाई करत असतील तर रिटेरल दुकानात मास्क व कोव्हिड संबंधित कोणतेही औषध विकणार नाही.अशी मागणी रिटेल केमिस्ट अशोसीएसनच्या वतीने एफडीआय अधिकारी चंद्रकांत मोरे,प्रशांत ब्राम्हणकर,एम देशपांडे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष धनंजय खाडगीर,विजय गायखे,नाशिक शहर अध्यक्ष उदय किनगे,सेक्रेटरी नितीन उगले,खजिनदार विजय पाटील,महिला संघटक क्रांती कोठावदे,सुनीता माळवदे आदीसह केमिस्ट उपस्थित होते.