शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

अखर्चित निधीवरून छगन भुजबळ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:28 AM

जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत ही बाब गंभीर असल्याने याप्रकरणी दोषी आढळणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.

ठळक मुद्देनियोजन समिती बैठक । कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नाशिक : जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत ही बाब गंभीर असल्याने याप्रकरणी दोषी आढळणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. उर्वरित निधी खर्चाच्या संदर्भात तरतुदी तातडीने पूर्ण कराव्यात असे आदेश देतानाच पुढील दहा दिवसांत पुन्हा नियोजन समितीच्या बैठकीत आढावा घेण्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी जाहीर केले.जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर खासदर भारती पवार, हेमंत गोडसे, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे,पोलीस अधीक्षक आरती सिंह उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी सन २०१८ ते २०१९ आणि २०१९ मधील सद्य:स्थिती यामधील सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेची माहिती घेतली. याप्रसंगी विविध विभागांतील अधिकाºयांनी मंजूर नियतव्यय आणि खर्च निधीचा आढावा सादर केला असता प्राप्त निधीच्या अत्यंत कमी टक्के काम झाल्याची बाब समोर आल्याने भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाºयांनी कर्तव्य आणि विकासाच्या बाबतीत दाखविलेल्या असंवेदनशील भूमिकेविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून जिल्ह्णाच्या विकासासाठी निधी हवाय की नको असा थेट प्रश्नच अधिकाºयांना विचारलाच शिवाय नाशिक जिल्ह्यात काम करायचे नसेल, तर ‘अन्य जिल्ह्यात खुशालजा’ असे म्हणण्याची वेळ भुजबळांवर आली.सन २०१९-२०२० मधील मंजूर नियतव्यय ७९१ कोटी रुपये असताना खर्च केवळ १६४ कोटी रुपयेच होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर असल्याचे भुजबळ यांनी अधोरेखित केले. ज्यांना मंजूर कामे, मागणी केलेला निधी, कामांचा तपशील तसेच स्पीलओव्हरची माहितीच सभागृहापुढे मांडता आली नाही अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेशच त्यांनी दिले.सरकार बदनाम होता कामा नयेअधिकाºयांनी आता लागलीच कामाला सुरुवात करा, असे सांगतानाच भुजबळ यांनी आपल्या खात्याचे पैसे योजनांवर खर्च कसे होतील याकडे अधिकाºयांनी लक्ष दिले पाहिजे सुचविले. सरकारचे नाव बदनाम होता कामा नये असे सांगून जिल्हाधिकाºयांनी अशा कामचुकार अधिकाºयांसदर्भात तातडीने निर्णय घेतले पाहिजे, असेही सांगितले. आगामी दहा दिवसांत कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी अधिकाºयांना दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी