नाशिक : तुरूंगातून जामिनावर सुटून सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोकळे झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची गेल्या २६ महिन्यांपासून काढून घेण्यात आलेली विशेष सुरक्षा व्यवस्था त्यांच्या जिवीताचा धोका पाहता पुन्हा बहाल करण्यात यावी यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी भुजबळ यांचे पूत्र आमदार पंकज भुजबळ व जयंत जाधव यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेवून तशी विनंती केली असून, त्यांनीही त्यास सकारात्मता दर्शविल्याचे वृत्त आहे.महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूवारी निवासस्थानी परतले आहेत. तत्पुर्वी बुधवारी भुजबळ यांचे पूत्र पंकज यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचा राजकीय अर्थ काढला जावून राज्यात उलट सुलट चर्चा पसरली असली तरी, ज्या प्रमाणे पंकज यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्याच प्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही सदिच्छा भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भुजबळ यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नाबाबत ऋण व्यक्त करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे भुजबळांचा जामीन अर्ज नामंजूर करून केला जात असलेल्या अन्यायाच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी चालविलेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या उपक्रमांतर्गंत नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्याकडे गाºहाणे मांडले होते. या साऱ्या घटनेच्या पार्श्वभुमीवर पंकज भुजबळ यांनी राज ठाकरे यांची भेट घेवून आभार मानले. या भेटीबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात आली, त्याच प्रमाणे मंगळवारी रात्री देखील पंकज व आमदार जयंत जाधव यांनी ‘वर्षा’ येथे जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतच जाधव यांनी फडणवीस यांना पत्र देवून भुजबळ यांना ‘झेड सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली. भुजबळ हे गृहमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता, ते पाहता त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी अशी विनंती केली आहे.
छगन भुजबळ यांना हवी ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:37 PM
महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूवारी निवासस्थानी परतले आहेत.
ठळक मुद्देफडणवीस यांना साकडे : राज ठाकरे यांचीही सदिच्छा भेट