नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा आमचा लढा असून, कितीही धमक्या आल्या तरी समाजाचे चक्र उलटे फिरविणाऱ्या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच राहणार, असे सडेतोड प्रत्युत्तर आमदार छगन भुजबळ यांनी दिले. आॅल इंडिया सैनी(माळी) समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. जय शंकर लॉन्स येथे रविवारी (दि.२८) आयोजित अधिवेशनात भुजबळ यांनी धमकी पत्राविषयी विरोधकांना थेट आव्हान दिले. यावेळी भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित संविधानाची रचना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार बहाल केले. देशातील वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी आरक्षण दिले. परंतु सध्याच्या काळात दिल्लीत संविधान जाळणाºया व्यक्तींवर कारवाई न करताच सोडून देण्यात येते, याउलट मनुस्मृती जाळणाºया लोकांवर गुन्हे दाखल केले जातात आमचा लढा हा समतेला विरोध करणाºया प्रवृत्तींच्या विरोधात आहे. असे भुजबळ म्हणाले.मनुस्मृती ग्रंथ तसेच संभाजी भिडे यांच्याविरोधात बोलले तर पानसरे, दाभोलकर यांच्याप्रमाणे हत्या करण्यात येईल, असे धमकीचे पत्र पाठविण्यात आले असले तरी अशाप्रकारचे अनेक पत्र प्राप्त झाले आहे. अशा धमक्यांना न घाबरता यापुढेही आम्ही मनुस्मृतीचे दहन करणारच,असा पुनरूच्चार केला.महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराला विरोध करणाºयाविरोधात आम्ही कधीही शांत बसणार नाही. अनेकदा आमचे तोंड बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अडीच वर्षे तुरुंगात ठेवले. मात्र याला आमचा कायम विरोध असणार असल्याचे यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या अधिवेषनात देशभरातून आलेल्या माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात भुजबळ यांना आलेल्या धमकीचा निषेध नोंदविला.अधिवेशनातील ठरावमहात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावाज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ३ जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा हे दोन महत्त्वाचे ठराव एक मताने मंजूर करण्यात आले.राष्ट्रवादीकडून मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्ननाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आलेल्या धमकी पत्राचे पडसाद शहरात उमटले. पंचवटी कारंजा येथे राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र पोहचल्याने राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राष्टÑवादीच्या काही कार्यकर्त्यांनी पंचवटी कारंजावर एकत्र येत मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे व मनुस्मुतीच्या विरोधात घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थीती निर्माण झाल्याने पोलिसांची धावपळ झाली. मनु फुले, शाहू, शिवराय, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या महाराष्टÑात समतेच्या विचाराला कोणीही दाबू शकणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
मनुवादी प्रवृत्तींविरुद्ध बोलतच राहणार : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:38 AM