शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

छगन भुजबळ यांचा विजयी चौकार; येवलेकरांचे विकासावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:53 AM

:Maharashtra Assembly Election 2019 येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा ५६ हजार ५२५ मतांनी पराभव केला.

येवला : येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा ५६ हजार ५२५ मतांनी पराभव केला. भुजबळ यांना १ लाख २६ हजार २३७ मते मिळाली. येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांचा लागापाठ चौथा विजय असून, या विजयी चौकाराने मतदारसंघावर त्यांची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. प्रशासनाच्या धीम्या गतीच्या कामामुळे व तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली.गुरुवारी सकाळी पाटोदा रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बाभूळगाव येथील इमारतीत सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम टपाली मतांची मोजणी करण्यात येणार होती. मात्र टपाली मतदान जास्त असल्याने ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात करण्यात्ां आली. महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पहिल्याच फेरीत २५४२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या फेरीत त्यांची आघाडी निरंतर वाढत्ांंच गेली. पाचव्या फेरीत तब्बल ११ हजार ५६७ मतांची आघाडी झाली. त्यामुळे भुजबळ मोठ्या फरकाने विजयी होणार असल्याचे संकेत मिळाले. क्रमश: आघाडी वाढतच गेली. तशी भुजबळ यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करण्यास सुरुवात केली. ११व्या फेरीअखेर २० हजार २१२ मतांची आघाडी भुजबळ यांनी घेतली. या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार असल्याचा अंदाज मतदारांनी साफ खोटा ठरवला. २२व्या फेरीअखेर छगन भुजबळ यांना १ लाख २० हजार ८४४ हजार मते मिळाली, तर सेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना ६६ हजार ९६४ मते मिळाली होती. २३व्या अंतिम फेरीसह तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित ६ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची व्हीव्हीपॅटद्वारे मोजणी करून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. छगन भुजबळ यांचा विजय निश्चित होताच, कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतमोजणीसाठी परिश्रम घेतले.विजयाची तीन कारणे...1मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्याद्वारे कातरणी व बाळापूरपर्यंत पोहोचले. हे पाणी डोंगरगावला नक्की येणार असा आशावाद जागवला गेला.2भूमिपुत्राच्या मुद्द्याऐवजी जनता विकासाचा मुद्दा सर्वसामान्य जनतेला अधिक भावला.3मुक्तिभूमीसह मागील १५ वर्षांत तालुक्यात झालेल्या विकासकामांची मतदारांनी दखल घेतली. आणि भुजबळांवर पुन्हा एकदा विश्वास दाखविला.पवारांच्या पराभवाचे कारण...विकासाच्या मुद्द्यापुढे भूमिपुत्राचा एकच मुद्दा कुचकामी ठरला. प्रचारातील विस्कळीतपणा, शिवाय निष्ठेने काम झाले नसल्याचे दिसून येते. आगामी पाच वर्षांत काय काम करणार याची दिशा मतदारांना फारशी स्पष्ट झाली नाही. सर्व विरोधक एकत्र आले असले तरी त्याचा मतांमध्ये अपेक्षित परिणाम जाणवला नाही.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ एकनाथ गायकवाड ब स.प. 635२ संभाजी पवार शिवसेना 69712३ सचिन अलगट वंचित ब. आ. 1858४ सुभाष भागवत महाराष्ट्र क्र ांती सेना 654५ महेंद्र पगारे अपक्ष 713६ विजय सानप अपक्ष 287७ संजय पवार अपक्ष 325

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yevla-acयेवलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक