समाजातील विविध क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या सावित्रींचा छात्रभारती राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सन्मान करण्यात आला. बस कंडक्टर, सफाई कामगार, कचरावेचक महिला, अंगणवाडी सेविका, समाजसेविका, शिक्षिका, शाहिरा इ. क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंची रांगोळी काढून करण्यात आली. त्यानंतर सवित्रीबाई फुले, फातिमा बी, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे वंदना मते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कंडक्टर- कंजना वाघ, सिक्युरिटी गार्ड- अर्चना शिंपी, अंगणवाडी-सविता कापडणे, शाहिरा-श्रावस्ती मोहिते, विद्यार्थी कार्यकर्ती-प्रिया ठाकूर व श्रद्धा कापडणे, व्यवसाय-प्रीती ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
(फोटो: ०४छात्रभारती)
कॅप्शन: छात्रभारती आणि राष्ट्र सेवा दलाच्यावतीने कर्तृत्ववान महिलांना सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पुरस्कारार्थींसह मान्यवर.