नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने संमत करण्यात आलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना उदध्वस्त करणारे असल्याचा आरोप करीत छात्रभारती व राष्टÑ सेवा दलाच्या वतीने गुरूवारी (दि. २४) सीबीएसवरील छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पुतळ्याजवळ पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने करण्यात आली. केंद्र शासनाच्या वतीने नुकतेच कृषी विधेयक संसदेत मंजुर केले आहे.यामुळे भविष्यात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. भांडवलदार आणि बड्या व्यवसायिकांचा मार्गच सरकारने खुला केला केला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून नवीन काही तरी करीत असल्याचे केंद्र सरकार भासवित असले तरी निर्बंध काढून वेगळ्या प्रकारची मक्तेदारी राज्य शासन निर्माण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कंत्राटी शेतीमुळे शेतकरी पुर्णत: उध्वस्त होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. आंदोलनात राकेश पवार, नितीन मते, अनिता पगारे, अॅड. शरद कोकोटे, सदाशिव गणगे, शीतल पवार, गोकुळ मेदगे, प्रिया ठाकूर, कल्याणी अ. म. स्वाती त्रिभूवन आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
कृषी विधेयकाच्या विरोधात छात्रभारतीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:02 AM
नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने संमत करण्यात आलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना उदध्वस्त करणारे असल्याचा आरोप करीत छात्रभारती व राष्टÑ सेवा दलाच्या वतीने गुरूवारी (दि. २४) सीबीएसवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देभविष्यात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार