शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, माजी सरपंच रामनाथ पावसे, नारायण वाजे, करण गायकर, सरपंच अर्जुन वाजे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष कचरू गंधास, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, नामदेव शिंदे, शरद कातकाडे, सतीश ढोली, हर्षल काळे, लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्था, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून आकर्षक स्मारक उभारले जात आहे. माजी आमदार वाजे यांचे त्यासाठी मार्गदर्शन लाभले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या निधीतून हे स्मारक होत आहे. उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव असलेल्या ऐतिहासिक डुबेरे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट स्मारक उभारले जात असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. स्मारक उभारणीसाठी सर्व परवानग्या घेण्यात आल्याची बाबही महत्त्वाची आहे. हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले. माजी आमदार वाजे यांनी खासदार संभाजीराजे यांनी डुबेरेला येत स्मारकाचे भूमिपूजन केल्याबद्दल ऋण व्यक्त केले. उदय सांगळे यांनी स्मारकाच्या कामाची माहिती दिली. सरपंच अर्जुन वाजे यांनी स्वागत केले. (२१ डुबेरे)
210821\023021nsk_43_21082021_13.jpg
संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते स्मारकाचे भुमिपुजन