कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास शनिवारी (दि.१३) दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे.चैत्रोत्सवाची सप्तशृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत तसेच प्रशासन, व्यापारी व व्यावसायिकांनी तयारी पूर्ण केली असून, चैत्रोत्सव काळात भाविकांच्या सोयी सुविधा व सुरक्षाविषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत खान्देशातील हजारो भाविक पायी चालत येतात. चैत्रोत्सवासाठी ग्रामस्थांसह सप्तशृंगगड प्रशासन, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांनी तयारी पूर्ण केली आहे.चैत्रोत्सवानिमित्त शनिवारपासून २० एप्रिलपर्यंत रोज सकाळी ७ वाजता भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता महापूजा, ९ वाजता भगवतीच्या नवचंडी यागास प्रारंभ होऊन चैत्रोत्सवास प्रारंभ होईल. त्याच दिवशी रामनवमी असल्याने मंदिरात जाताना राम टप्प्यावरील श्रीराममंदिरात दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. दुपारी ३ ला भगवतीच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. गुरुवारी (दि. १८) उत्तर महाराष्ट्रातील व कसमादे पट्ट्यातील लाखो पदयात्रेकरू मजल-दरमजल करीत गडावर दाखल होणार आहेत. याच दिवशी दुपारी ३ वाजता ध्वजाचे विधिवत पूजन न्यासातर्फे करण्यात येऊन ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील यांच्याकडे ध्वज सुपूर्द केल्यानंतर कीर्तिध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल व रात्री बाराला मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकणार आहे. ७५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरचैत्रोत्सवावर ७५ कॅमेºयांची नजर राहणार असून, ५५० सुरक्षारक्षक व महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहदलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवणार आहेत. ऐनवेळेस निर्माण होणाºया आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व यात्रेदरम्यान मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा देण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी १० पाणपोई व २४ तास लॉकर, चप्पल स्टॅण्ड व्यवस्था करण्यात आली आहे.श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या परिसरात सुरळीत वीज वितरण व्यवस्था महावितरण करणार आहे. न्यासाच्या पाच जनरेटरद्वारे अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात येणार आहे. भाविकांना ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाºया सेवा-सुविधा योग्य पद्धतीने पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रथमत: सुविधा केंद्र (तात्पुरते कार्यालय) स्थापन करण्यात आले असून, सदर कार्यालयांतर्गत येणाºया भाविकांच्या अडीअडचणींवर ट्रस्टच्या वतीने सहकार्य करण्यात येणार आहे. पाणपोई, देणगी काउण्टर, लाडू विक्र ी केंद्र, प्राथमिक आरोग्य कार्यवाही, समन्वय कक्ष आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून चैत्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांनी स्वच्छतेची काळजी घेत प्लॅस्टिकमुक्त यात्रा पार पाडावी. प्रशासनाला सहकार्य करून दर्शनाचा लाभ घ्यावा.- डॉ. रावसाहेब शिंदे, विश्वस्त, श्री सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचैत्रोत्सव काळात देवी मंदिर २४ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहील. सकाळी ११ ते रात्री १०.३० या कालावधीत श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे प्रसादालय भाविकांसाठी खुले राहणार आहे. तसेच २४ तास भक्तनिवास व्यवस्था तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २४ तास आरोग्य व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. २४ तास वीजपुरवठा व आवश्यकतेनुसार जनरेटरची सोय उपलब्ध राहील.ध्वनिक्षेपकासह क्लोज सर्किट टीव्हीची व्यवस्था, भाविकांसाठी ११०० बसेसचैत्रोत्सवात मंदिर २४ तास खुले, चार डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, दीपमाळेसाठी तेल अर्पण करण्याची स्वतंत्र यंत्रणा, पहिल्या पायरीजवळ कर्पूर कुंड, पायºयांदरम्यान विविध ठिकाणी उद्भोदन कक्ष, नारळ फोडण्यासाठी ५ मशीन, ध्वनिक्षेपक व क्लोज सर्किट टीव्हीची व्यवस्था, प्रथमोपचार केंद्र २४ तास कार्यान्वित, दर्शनासाठी १५ बाºया, ९० कर्मचारी नियुक्त, वीजपुरवठ्यासाठी दोन जनरेटरची व्यवस्था, राज्य परिवहन महामंडळाच्या ११०० बसेस, श्री भगवती मंदिर तेपरशुराम बालापर्यंतचा मार्ग यंदाही बंद.
सप्तशृंगीदेवीचा आजपासून चैत्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 9:58 PM
कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास शनिवारी (दि.१३) दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे.
ठळक मुद्देंभाविकांमध्ये उत्साह : कीर्तिध्वजाची सवाद्य मिरवणूक; मंदिर २४ तास खुले