जळगाव नेऊर : चिचोंडी येथील अगस्ती नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ चिचोंडी बुद्रुक सरपंच रविंद्र गुंजाळ, नवचेतना अकॅडमीचे संतोष मढवई, उपसरपंच साईनाथ मढवई ग्रामपंचायत सदस्य सविता धीवर यांच्या हस्ते करण्यात आला.अगस्ती नदीपात्रात बंधारे असून देखील शेतकऱ्यांना पाण्याचा फारसा फायदा तेथील गाळामुळे होत नव्हता. याची दखल \येथील शिवयोद्धा सोशल फाउंडेशनच्या युवकांनी घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ह्यगाळमुक्त धरण व गाळयुक्त शेतीह्ण या संकल्पनेतून बुधवारी (दि.३) गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी नारायण खराटे, गाळ उपसा समिती अध्यक्ष बाबासाहेब मढवई, सदस्य सचिन पवार, समाधान मढवई, महेश पाटील, काका मढवई, दत्तू माळी, संजय व्यवहारे, परसराम पवार, शरद पवार, चेतन पवार, दत्तू सुर्यवंशी, ज्ञानेश्वर गुंजाळ, बाळू पवार, किसन पवार, समाधान लहरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.