नाशिक : जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांची मुंबईतील राज्य सहकार अपिलीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे़ यामुळे नाशिक बार असोसिएशनतर्फे सोमवारी (दि़३१) जिल्हा न्यायालयातील लायब्ररी हॉलमध्ये सत्कार करून निरोप देण्यात आला़ नाशिकच्या प्रधान न्यायाधीशपदी मुंबई उच्च न्यायालयातील रजिस्टार आऱ एऩ जोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही़
प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी ११ जुलै २०१७ रोजी पदभार स्वीकारला होता़ त्यांच्या कारकिर्दीच पोलिसांच्या अडीच एकर जागेचे हस्तांतरण, नाशिकरोड न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम, जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम आराखडा तयार करण्यात आल्याचे अॅड़ ठाकरे यांनी सांगितले़ यावेळी अॅड़ ठाकरे व अॅड़ अविनाश भिडे यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला़
यावेळी सहायक जिल्हा सरकारी वकील कल्पक निंबाळकर, बार असोसिएशनचे सदस्य अॅड. शरद गायधनी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संजय गिते यांनी केले, तर अॅड. श्यामला दीक्षित यांनी आभार मानले. यावेळी नाशिक बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते़