सिन्नर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी विंचूर दळवी ग्रामपंचायतने सुरु केलेल्या संस्थात्मक विलीगीकरण केंद्रास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. याठिकाणी उपलब्ध सुविधा, इमारत, पाणी, स्वच्छतागृहाची त्यांनी पाहणी केली.बनसोड यांनी गावातील कंन्टोमेंट झोन मधे केलेल्या बॅरीगेटिंग १४ दिवस ठेवणे तसेच रुग्णाच्या घरातील व अत्यावशक सेवा देणाऱ्या दुकानदारांचे टेस्टिंग करण्याच्या सूचना दिल्या. गावातील रुग्ण संख्या ४५ असून त्यापैकी १८ रुग्ण बाधित तर गृह विलगीकारणात १०, संस्थात्मक विलगीकारणात २, दाखल असल्याचे सरपंच सुशिला भोर व ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी माहिती दिली. संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, पाढूलीं प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी लहू पाटील, ग्रामपंचायतचे माजी सरपंच कैलास दळवी, ग्रामपंचायत उपसरपंच अरुण दळवी, ग्रामपंचायत सदस्य परसराम दळवी, बाजीराव भोर, सुनिल दळवी, लक्ष्मण भोर यांच्यासह विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, सुशील पगार, पोलीसपाटील रमेश अभंग उपस्थित होते.