शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:38 AM

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले नरेश गिते यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली. दीपककुमार मीणा यांनी गिते यांच्याकडे सूत्रे सुपुर्द केली.

ठळक मुद्देमीणा यांची तडकाफडकी उचलबांगडीजिल्हा परिषदेच्या कामांचा चांगला अनुभव

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले नरेश गिते यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली. दीपककुमार मीणा यांनी गिते यांच्याकडे सूत्रे सुपुर्द केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गिते यांचे स्वागत केले.जिल्हा परिषदेचे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा सोमवारी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी मीराभार्इंदर महापालिकेचे आयुक्त नरेश गिते यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. गिते यांनी मंगळवारी सायंकाळी मीणा यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेत आपण चांगले काम करून दाखवू, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्णातील कुपोषणावर प्रभावी कामकाज करण्याचा मनोदय व्यक्त केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कुपोषणग्रस्त भागात आपण नाशिक जिल्ह्णातील आदिवासी भागातील कुपोषणग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे. तेथील प्रश्नांची आपणाला माहिती असल्याने त्याचा उपयोग कुपोषणावर काम करताना नक्कीच होईल, असेही ते म्हणाले. गिते यांनी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांचीही भेट घेतली. यावेळी सांगळे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, रत्नाकर पवार, गोरख बोडके आदी उपस्थित होते.मीरा भार्इंदरचे आयुक्त असलेले गिते यांनी यापूर्वी गटविकास अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कामकाज केलेले असल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या कामांचा चांगला अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर आपण नाशिक जिल्हा परिषदेच चांगले काम करून दाखवू, असा विश्वास त्यांनी केला. जिल्हा परिषदेत कर्मचाºयांची अपुरी संख्या तसेच विकासकामे आणि निधीची सांगड घालून विश्वासाने काम करावे लागणार आहे. अधिकारी, कर्मचाºयांना बरोबर घेऊन कामकाज केले जाईल, असे गिते यावेळी म्हणाले.