नाशिक : शहरात राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने शनिवारी (दि.१५) सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रथमच आगमन होत असून, त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा न्यायालय आवारात आयोजित या दोनदिवसीय परिषदेला रविवारी (दि. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.विविध विषयांवर मंथनवकिलांच्या दोनदिवसीय परिषदेत जलद न्यायदान हा पक्षकाराचा मूलभूत अधिकार या प्रमुख विषयासह सर्वोच्च न्यायालय ते जिल्हा पातळीवरील न्यायालयांचे विकेंद्रीकरण-काळाची गरज, सक्षम, प्रभावी व मोफत कायदा सहाय्य आणि वकिली व्यवसायापुढील आव्हान व उपाय याविषयांवर मंथन होणार आहे.(पान ५ वर)
सरन्यायाधीश शरद बोबडे आज पहिल्यांदाच नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 1:34 AM
शहरात राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने शनिवारी (दि.१५) सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रथमच आगमन होत असून, त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा न्यायालय आवारात आयोजित या दोनदिवसीय परिषदेला रविवारी (दि. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
ठळक मुद्देवकिलांची परिषद : उद्या नूतन इमारतीचे उद्घाटन