लोकमत न्यूज नेटवर्कभगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने भगूर येथे आयोजित जयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी भगूरमध्ये येणार असल्याची शक्यता भगूरचे शहराध्यक्ष कैलास गायकवाड यांनी माहिती दिली. कलावंत अशोक हांडे यांच्या प्रयत्नातून भगूरमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी अनेक मंत्रिगण उपस्थित राहणार असल्याचे समजते. सावरकर यांच्या जयंतीनमित्ताने अशोक हांडे यांनी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ‘सावरकर दर्शन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्मारकाच्या दर्शनासाठी अनेक मंत्री, पालकमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीर अशोक हांडे यांनी सावरकर स्मारक, मंदिर परिसर तसेच आठवडे बाजार परिसराची पहाणी केली. यापैकी एका ठिकाणी सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, अभिनेते भरत जाधव हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्यांचे नाटक सादर होणार असल्याचीही चर्चा आहे. कार्यक्रमाची अधिकृत माहिती जाहीर झाली नसली तरी याबाबतची घोषणा लवकरच होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस २८ रोजी भगूरमध्ये
By admin | Published: May 22, 2017 2:18 AM