शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

महापालिकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Published: May 26, 2017 12:20 AM

नाशिक : नाशिक शहराचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी (दि.२८) नाशिक दौऱ्यावर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक शहराचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी (दि.२८) नाशिक दौऱ्यावर येत असून, यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत महापालिका मुख्यालयात होणाऱ्या बैठकीत विविध प्रकल्पांसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री प्रथमच महापालिका मुख्यालयात बैठकीसाठी येणार असल्याने आयुक्तांनी शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. नाशिक महापालिकेची आर्थिक प्रकृती गेल्या पाच ते सात वर्षांपासून पुरती बिघडलेली आहे. जकात रद्द झाल्यानंतर एलबीटी लागू झाला, परंतु नंतर ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटीही रद्द होऊन महापालिकेला शासन अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातही दरवर्षी ८ टक्के वाढ धरून अनुदान दिले जात असल्याने महापालिकेला आर्थिक गाडा हाकणे दुरापास्त बनले आहे. आता जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होत असली त्याच्या अनुदानाबाबतही स्पष्टता नसल्याने स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्पांसाठी अर्थभार उपलब्ध करून देण्याविषयी साशंकता आहे. महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले असले तरी यंदा केवळ १५८ कोटी रुपयेच भांडवली कामांसाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे प्रशासनापुढे आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत येत्या रविवारी (दि.२८) मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येत असल्याने महापालिकेमार्फत त्यांना निधीसाठी साकडे घातले जाणार आहे. त्यात प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांकडे विविध रस्ते तसेच आरक्षित जागांच्या भूसंपादनाकरिता सुमारे ८०० कोटी रुपये, किकवी धरणासाठी ५०० कोटी रुपये तसेच पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनसह विविध प्रकल्पांसाठी असे एकूण सुमारे दोन हजार कोटी रुपये निधीसाठी साकडे घातले जाणार आहे. नाशिकचे पालकत्व घेणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आता महापालिकेच्या पदरात किती दान पडते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरले आहे.