नाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी खात्याचे अधिकारी व्यस्त होते. ज्या शेतकºयांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळाला अशा ‘समाधानी’ शेतकºयांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना काय बोलावे व काय बोलू नये याचे धडे देण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी संवाद साधणार असल्यामुळे सकाळी ८ वाजेपासूनच शेतकरी गावाहून जिल्ह्णाच्या मुख्यालयी पोहोचले. परंतु नियोजित वेळेत बदल करण्यात येऊन दुपारी पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तेथून लोकसंवादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास बहुतांशी जिल्ह्यांशी संवाद साधला. उत्तर महाराष्टÑातील जळगाव व नगर जिल्ह्यांतील शेतकºयांना ‘हाल-हवाल’ विचारणाºया मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा पडली तर कृषी खात्याने आपले पितळ उघडले झाले नाही म्हणून समाधान व्यक्त केले. मुळात नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळत असून, शेतकºयांनी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे, तर गावोगावी कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला जात आहे.खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायमसरकारकडून अद्यापही कांद्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित करून व्यथा मांडल्यास सरकारचे हसे होण्याची शक्यता गृहीत धरूनच मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे पाठ फिरविली. दुपारी २ वाजता हा संवादाचा कार्यक्रम चालला तोपर्यंत खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायम राहिली. या संवादापासून शासकीय अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले होते.
शेतकरी हिरमुसले : कांद्याच्या प्रश्नावरून चर्चा टाळलीलोकसंवादात मुख्यमंत्र्यांची नाशिकला हुलकावणीनाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी खात्याचे अधिकारी व्यस्त होते. ज्या शेतकºयांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळाला अशा ‘समाधानी’ शेतकºयांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना काय बोलावे व काय बोलू नये याचे धडे देण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी संवाद साधणार असल्यामुळे सकाळी ८ वाजेपासूनच शेतकरी गावाहून जिल्ह्णाच्या मुख्यालयी पोहोचले. परंतु नियोजित वेळेत बदल करण्यात येऊन दुपारी पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तेथून लोकसंवादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास बहुतांशी जिल्ह्यांशी संवाद साधला. उत्तर महाराष्टÑातील जळगाव व नगर जिल्ह्यांतील शेतकºयांना ‘हाल-हवाल’ विचारणाºया मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा पडली तर कृषी खात्याने आपले पितळ उघडले झाले नाही म्हणून समाधान व्यक्त केले. मुळात नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळत असून, शेतकºयांनी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे, तर गावोगावी कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला जात आहे.खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायमसरकारकडून अद्यापही कांद्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित करून व्यथा मांडल्यास सरकारचे हसे होण्याची शक्यता गृहीत धरूनच मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे पाठ फिरविली. दुपारी २ वाजता हा संवादाचा कार्यक्रम चालला तोपर्यंत खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायम राहिली. या संवादापासून शासकीय अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले होते.