शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

फेरनियोजनाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:44 AM

नाशिक : जिल्हा परिषदेच्या २१ कोटींच्या रस्ते कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करून नव्याने फेर नियोजन करण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या उपसचिवांच्या आदेशाला मुख्यमंत्री कार्यालयाने स्थगिती दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारी (दि.४) होती.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या २१ कोटींच्या रस्ते कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करून नव्याने फेर नियोजन करण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या उपसचिवांच्या आदेशाला मुख्यमंत्री कार्यालयाने स्थगिती दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारी (दि.४) होती.दरम्यान, यासंदर्भात संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याने हे फेर नियोजन संकटात सापडल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्री कार्यालयाने आदिवासी विकास सचिवांना त्यासंदर्भात आदेश दिल्याचे कळते. तत्पूर्वी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे यांनी २१ कोटींच्या रस्ते प्रशासकीय मान्यता रद्द करून नव्याने फेरनियोजन करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाला दिले होते. आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी उलट टपाली पत्र पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण पाठविलेल्या अ. शा. पत्रानुसार जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०१६-१७ करिता जिल्हा नियोजन समितीच्या मागणी क्र. टी-६ लेखाशीर्ष - ५०५४-०४०२, जिल्हा व इतर मार्ग (जिल्हा स्तर योजना) अंतर्गत नाशिक जिल्ह्णातील १४२ रस्त्यांच्या कामांकरिता दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात येत असल्याबाबत कळविण्यात आले आहे.त्याअनुषंगाने आपल्याला कळविण्यात येते की, प्रशासकीय मान्यता रद्द करणे ही बाब वैधानिक स्वरूपाची असून, त्यामुळे करार रद्द होणे आदी बाबी संभावतात. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाºयांची प्रशासकीय मान्यता आदेश रद्द करावयाचे असल्यास शासनस्तरावरून तसा शासन निर्णय आवश्यक राहील आणि शासनाने तसे निर्देश जिल्हाधिकाºयांना देणे अभिप्रेत आहे. विभागीय आयुक्तांनी उपसचिवांना पाठविलेल्या १ आॅगस्टच्या पत्रामुळे या कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढावे लागण्याची बाब अधोरेखित झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे फेर नियोजनाचे आदेशच रद्दबातल ठरविण्याबाबत आदिवासी विकास सचिवांना सूचना देण्यात आल्याने जिल्हा परिषदेत तो एक चर्चेचा विषय होता. कामांवरून मंत्र्यांमध्ये वाद२१ कोटींच्या कामांवरून लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन हा वाद शिगेला पोहोचला होता. तसेच भाजपाच्याच आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा विरुद्ध जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यातच जुंपल्याची चर्चा होती. अखेर या संघर्षात गिरीश महाजन वरचढ ठरल्याचे तूर्तास तरी दिसून येत आहे.