नाशिक : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मराठा आरक्षणासह, शेतकरी, कामगार आदिवासी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्याचा प्रश्नांचा डोंगर असताना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी मुख्यमंत्र्यांना महापूजा करून देणार नाही, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.मराठा समाजाला आरक्षणासासाठी मुंबईसह राज्यात ५८ मोर्चे निघाले. परंतु, केवळ आश्वासनांशिवाय समाजाच्या हातात काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता लेखी आश्वासनाशिवाय कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज मागे हटणार नसून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यातून लाखो मराठा समाजाचे स्वयंसेवक पंढरपूरला रवाना होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे छावा क्रांतिवर संघटनेचे करण गायकर व अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश संपर्कप्रमुख तुषार जगताप यांनी शासकीय विश्रामगृहतील पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षभरापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात पन्नासहून अधिक मोर्चे निघाल्यानंतर मुंबईत मराठा समाजाचा महामोर्चा धडकला, तरीही राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला जाग आलेली नाही. त्यांनी सातत्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, मराठा समाजाच्या मागण्यांसह देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रश्नांवर तोडगा काढण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाने आता ‘मूक’ मोर्चा ऐवजी ‘ठोक’ मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. परळीतून या आंदोलनाला सुरुवात झाली असून, पंढरपुरात मराठा समाज व शेतकऱ्यांचा विरोध झुगारून मुख्यमंत्र्यांनी महापूजा केली, तर होण्याºया परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही त्यांनी ठेवावी, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला.
भरतीप्रक्रियेला स्थगिती द्यामराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना राज्य सरकारने भरतीप्र्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मराठा तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर आरक्षित जागांवर भरतीप्रक्रिया घेण्याचे दिलेले आश्वासन फ सवे असून, मराठा समाजाला डावलण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप करतानाच मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत भरतीला स्थगिती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.मुख्यमंत्री बदला, भाजपाला इशारामराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवल्यामुळे जातीय द्वेशातून मुख्यमंत्र्यांविरोधात षडयंत्र होत असल्याचा अथवा राजकीय षडयंत्राचा रंग दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने नितीन गडकरी अथवा अन्य कोणी सक्षम व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवावे, परंतु मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आमदारांना फि रू देणार नाहीमराठा समाजाच्या आमदारांसमोर समाजाच्या प्रश्नांपेक्षा पक्ष आणि त्यांचे नेते मोठे झाले आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी या प्रश्नाला वाचा फोडली तरीही समाजाचे सुमारे १४५ आमदार विधीमंडळात मूग गिळून गप्प बसले आहेत. जर मराठा समाजाला आरक्षण डावलून राज्यात भरती प्रक्रिया राबविली गेली, तर मराठा समाजाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघ