नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
क्षमतेपेक्षा अधिक वजन; खानसामाला उतरविले खाली
नाशिक : नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने शनिवारी सकाळी टेक आॅफनंतर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये काठोकाठ भरलेल्या इंधनामुळे वाढलेले वजन व मुख्यमंत्र्यांच्या खानसामाला (कुक)सोबत नेण्याच्या अट्टाहासामुळे थेट मुख्यमंत्र्यांच्याच जीवितालाच धोका निर्माण झाल्याचे पाहून अखेर पायलटने समयसुचकता दाखवित वीस फुटावरून हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरविले व खानसामाला नाशिकला सोडूनच पंधरा मिनिटांनी मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना झाले.या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेलिकॉप्टर ‘धार्जिणे’ नसल्याची चर्चा होऊ लागली असून, यापूर्वीही तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अतिवजनाने तर तांत्रिक बिघाडाने टेकआॅफनंतर खाली उतरावे लागले आहे. शुक्रवारी नंदुबारची जाहीर सभा आटोपण्यास सायंकाळी उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीने रात्री नाशिक मुक्कामी थांबले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शनिवारी सकाळी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिर असल्याने तेथे वेळेत पोहोचण्यासाठी राज्य सरकारचे खास हेलिकॉप्टर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासच नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर येऊन पोहोचले होते. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहावरून वाहनांच्या ताफ्यात पोलीस परेड मैदानावर पोहोचले (पान ७ वर)नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग(पान १ वरून)व पायलटने हेलिकॉप्टर सुरू केले. मुख्यमंत्र्यांना शासकीय अधिकाºयांनी सी-आॅफ केले, तर पोलिसांनी गार्ड आॅफ आॅनर दिल्यावर मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे कार्यसन अधिकारी अभिमन्यू पवार व खानसामा सतीश कानेकर हे पायीच हेलिकॉप्टरकडे निघाले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या हेलिकॉप्टरसाठी खास तरतूद म्हणून दोन पायलट ठेवले जातात, त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा व्यक्ती विराजमान झाल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री औरंगाबादचा कार्यक्रम आटोपून थेट त्याच हेलिकॉप्टरने नागपूर रवाना होणार असल्यामुळे शुक्रवारीच नाशिकमध्ये हेलिकॉप्टरच्या इंधनाची टाकी फुल्ल करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे अगोदरच हेलिकॉप्टरचे वजन क्षमतेइतके असताना त्यात आणखी एका व्यक्तीची भर पडली.चौकट=====औरंगाबाद पोहोचेपर्यंत यंत्रणा कार्यान्वितमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने नऊ वाजून ४७ मिनिटांनी औरंगाबादकडे उडाण घेतल्यानंतर तत्काळ तशी कल्पना औरंगाबाद येथे देण्यात आली, शिवाय ज्या हवाई मार्गाने मुख्यमंत्री रवाना होणार होते, त्या मार्गावरील पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांना अलर्ट करण्यात आले होते. नाशिकमध्ये उतरवून घेतलेले मुख्यमंत्र्यांचे खानसामा सतीश कानेकर यांना पालकमंत्र्यांच्या पायलट कारने औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. साधारणत: साडेदहा वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये सुखरूप उतरल्याचा निरोप आल्यानंतर नाशिकच्या अधिकाºयांचा जीव भांड्यात पडला. पंधरा मिनिटे जीव टांगणीलामुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने ९ वाजून ३२ मिनिटांनी टेकआॅफ केले, हेलिकॉप्टरने एक गिरकी घेऊन वर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पंधरा ते वीस फुटावरच ते रेंगाळले, वजनाची क्षमता अधिक झाल्याने आणखी वर जाण्यासाठी पायलटने प्रयत्न करूनही ते उडाण भरत नसल्याचे पाहून तत्काळ हेलिकॉप्टर खाली उतरविण्यात आले, दरम्यान, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी आलेले शासकीय अधिकारी, भाजपाच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला. पोलीस परेड मैदानावर एकच धावपळ उडाली. पायलटने समयसुचकता दाखवित पुन्हा हेलिकॉप्टर जमिनीवर स्थिरस्थावर केल्यावर खानसामा सतीश कानेकर यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर सुरू करण्यात आले. साधारणत: ९ वाजून ४७ मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने पुन्हा उडाण भरले, त्यावेळी सर्वांनीच श्वास रोखून धरला. परंतु अवघ्या काही वेळातच हेलिकॉप्टरने आकाशात उंच भरारी घेतली.