शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलसाठी पैसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 1:32 AM

तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोटोकॉलसाठी मोठा खर्च झाल्याचे कारण दाखवून शहर धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकुनाकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त होऊनही सदर कर्मचाºयावर मेहेरनजर दाखविली जात असल्याने या संदर्भातील व्यक्त होणाºया संशयाला पुष्टी मिळू लागली आहे.

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोटोकॉलसाठी मोठा खर्च झाल्याचे कारण दाखवून शहर धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकुनाकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त होऊनही सदर कर्मचाºयावर मेहेरनजर दाखविली जात असल्याने या संदर्भातील व्यक्त होणाºया संशयाला पुष्टी मिळू लागली आहे. विशेष म्हणजे दुकानदारांकडून खुलेआम पैशाची मागणी करणाºया या कर्मचाºयावर लाचलुपचपत प्रतिबंधक खात्याने एकदा कारवाई करूनही त्याची नेमणूक पुरवठा ‘खात्या’त करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे रेशन दुकानदारांचे चलन पास करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करणाºया पुरवठा कार्यालयातील अधीक्षक ए. डी. शेख याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या जागी नेमणूक झालेले अव्वल कारकून अनिल गायकवाड यांनीदेखील तोच कित्ता गिरविण्यास सुरुवात केल्यामुळे रेशन दुकानदारांसह धान्य वितरण कार्यालयात शासकीय कामासाठी येणारे नागरिक व खुद्द या कार्यालयातील कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.गायकवाड यांच्यावर पैसे घेतल्याचा गुन्हा तसेच कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल दोन वेळा निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. अशा पद्धतीचे कृत्य असतानाही त्यांची नेमणूक पुरवठा खात्यात करून प्रशासनाने एकप्रकारे बक्षिसी व रानच मोकळे केल्याची भावना तक्रारदाराने व्यक्त केली आहे. गायकवाड यांना प्रशासनाकडून मिळणाºया अभयाबद्दल या संदर्भात थेट पुरवठामंत्री व सचिवांकडे तक्रार करण्यात येणार असून, त्यांच्या कृत्यामुळे महाराष्टÑाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बदनाम होत असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.खुलाशावर समाधानाची बाब संशयास्पदच्मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलसाठी खर्च करावा लागल्याचे कारण सांगून रेशन दुकानदारांकडून खुलेआम पैशांची मागणी करण्याबरोबरच पैशांशिवाय चलन पास न करण्याचे प्रकारही या कार्यालयात घडू लागले असून, नागरिकांशी व सहकाºयांशी होणाºया वादावादीचे प्रसंगही नियमित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांच्या वादग्रस्त वर्तणुकीच्या अनेक ध्वनिचित्रफितींच्या पुराव्यानिशी तक्रारी पुरवठा खात्याकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींबाबत गायकवाड यांच्याकडून खुलासाही मागविण्यात आला असून, त्यात त्याने मुख्यमंत्र्यांच्या नावे पैसे गोळा केल्याची कबुली दिल्याची चर्चा होत असली तरी, त्याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र त्याच्या खुलाशावर पुरवठा खात्याने समाधान मानण्याची बाब संशयास्पद आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयChief Ministerमुख्यमंत्रीGovernmentसरकार