नाशिक : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदे देवून राजकीय भ्रष्टचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत बोलत होते. काग्रेससोडून भाजपाते गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंत्रिपदे ही घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना काँग्रेसतून भाजापात आलेले विखे व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रीपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार असून हा राजकीय भ्रष्टाचार खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याप्रकरणी सोमवारी (दि.२४) उच्च न्यायालायत सुनावणी होणार असून त्यानंतर हे प्रकरण अधिक स्पष्ट होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्ते केले.दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्शभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीविषयी चर्चा सुरु असून वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याविषयी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव, आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी जिल्हा राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक हेमलता पाटील. डॉ. प्रतापराव वाघ आदि उपस्थित होते.
विखे, क्षीरसागर यांना मंत्रीपदे देणे मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 5:07 PM
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदे देवून राजकीय भ्रष्टचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय भ्रष्टाचारमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप विखे, क्षीरसागर यांची मंत्रीपदे घटना बाह्य असल्याचा दावा