नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा शुक्रवारी महापौरांसह आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचला खरा; मात्र फडणवीस यांनी मुंढे यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही कानपिचक्या दिल्या आणि पुन्हा अशाप्रकारचे वाद आपल्यापर्यंत येता कामा नये, अशी तंबी दिल्याचे वृत्त आहे.महापालिकेत फेब्रुवारी महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे रुजू झाल्यापासून महापालिकेतील नगरसेवक आणि त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. मुंढे यांच्या विरोधात अनेकदा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर उपयोग होत नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. ५) बोलविलेल्या महापालिकेच्या आढाव्याचे निमित्त पदाधिकाºयांनी शोधले. बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी आक्रमक होत भावना व्यक्त केल्या. आयुक्तआल्यापासून लोकप्रतिनिधींना किंमत राहिली नसून दोन पाट्या मुरूमदेखील मागण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. अधिकारी बोलवूनदेखील पदाधिकाºयांकडे येत नाहीत तसेच नगरसेवकांची कामे ऐकत नाहीत, नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या. आमदार बाळासाहेब सानप यांनीदेखील आयुक्तांनी आमदारांच्या निधीला शहरात बंदी असल्याची तक्रार करताना लोकप्रतिनिधींना अधिकारच राहिले नसल्याचे सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर दोघांनाही बजावताना वाद टाळण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे महापालिकेच्या पदाधिकाºयांनादेखील चुकीचे कामकाज करताच कशाला, असा प्रश्न केला. महापालिकेत सत्ता मिळाली आहे त्या अनुषंगाने लोकहिताचे नियमानुसार प्रस्ताव मंजूर करा, नियमबाह्ण काम करूच नका की असे ठराव आयुक्तांना विखंडित करण्यासाठी माझ्याकडे पाठवावे लागतील, असेही ते म्हणाले.परस्परांचा सन्मान करण्याच्या सूचनालोकप्रतिनिधींचा मान, सन्मान करीत जा, त्यांनी सांगितलेली कामे झाली पाहिजे, त्याचप्रमाणे नगरसेवक निधीदेखील त्यांना खर्च करण्याची मुभा द्या, शेवटी नगरसेवकांना निवडणुकांना सामोरे जावे लागते अधिकाºयांना नाही असे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांना सुनावल्याचे समजते. महासभा किंवा स्थायी समितीवर प्रस्ताव मांडताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे, त्यांच्याशी वाद करण्यापेक्षा संवाद वाढवा, सर्वच नगरसेवकांशी शक्य नसेल तर किमान महापौरांशी तरी संवाद साधलाच पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्तांना कामकाज सुधारण्याबाबत बजावले.
मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त, लोकप्रतिनिधींना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:49 AM
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा शुक्रवारी महापौरांसह आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचला खरा; मात्र फडणवीस यांनी मुंढे यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही कानपिचक्या दिल्या आणि पुन्हा अशाप्रकारचे वाद आपल्यापर्यंत येता कामा नये, अशी तंबी दिल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देयापुढे वाद नको : समन्वयाने काम करण्याच्या सूचना