लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळूंजे येथील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक मिलिंद जगन्नाथ घाटकर याला ५ हजार रु पये लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले.याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार नाशिक एज्युकेशन सोसायटीची त्र्यंबकेश्वर तालुक्यात वेळुंजे येथे आश्रमशाळा आहे. याठिकाणी तक्र ारदाराचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलाचे प्रस्ताव आदिवासी विकासच्या नाशिक येथील प्रकल्प कार्यालयात पाठवून मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक घाटकर याने ५ हजार रु पयांच्या लाचेची मागणी केली होती.याबाबतची माहिती तक्र ारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देत तक्र ार केली. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळापूर्ण पडताळणीत मुख्याध्यापक घाटकर यांनी लाच घेताना रंगेहात अटक केली.याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच हजाराची लाच स्विकारताना वेळूंजेच्या मुख्याध्यापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:46 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळूंजे येथील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक मिलिंद जगन्नाथ घाटकर याला ५ हजार रु पये लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले.
ठळक मुद्देमुख्याध्यापक घाटकर याने ५ हजार रु पयांच्या लाचेची मागणी केली होती.