पेठ : तालुक्यातील कुळवंडी व परिसरातील गावांमध्ये गत १५ दिवसांपासून चिकूनगुनिया, डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, आरोग्य व ग्राम पंचायत विभागाने साथरोग प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत.जुलै महिना संपत आला असला तरीही पुरेसा पाऊस सुरू झाला नसल्याने गावागावात साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, हातपाय दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्ररीवरून तहसीलदार संदीप भोसले, सभापती विलास अलबाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी आरोग्य पथकासह गावांना भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये बहुतांश रुग्णांना अनेक दिवसांपासून त्रास होत असून, कुळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून गावात साथरोग प्रतिबंधक फवारणी करण्याचे तसेच पाण्याचे नमुने तपासणीचे आदेश देण्यात आले. नागरिकांनी त्रास होत असल्यास तत्काळ नजीकच्या आरोग्य उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.कोरडा दिवस पाळावासध्या पाऊस नसल्याने घराघरात पाण्याचा साठा होतांना दिसत असून, नागरिकांनी पाण्याच्या भांड्यावर घट्ट झाकण ठेवावे, आठवड्यातून एक दिवस सर्व भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळावा, घराच्या परिसरात पाणी साठत असेल तर त्याला वाट करून द्यावी, लक्षणे दिसून आल्यास आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली.
चिकूनगुनिया, डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:49 PM
पेठ : तालुक्यातील कुळवंडी व परिसरातील गावांमध्ये गत १५ दिवसांपासून चिकूनगुनिया, डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, आरोग्य व ग्राम पंचायत विभागाने साथरोग प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ठळक मुद्देपेठ तालुक्यात आरोग्य खात्याकडून उपाययोजना सुरू