महापालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी घटनास्थळी भेट दिली असून, तातडीने परिसर स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तसेच साचलेले पाणी प्रवाही करतानाच अनेक ठिकाणी टायरदेखील जप्त करण्यात आले.
गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये डेंग्यू त्रासदायक ठरत आहे. शहरातील डेंग्यू झालेल्यांची संख्या हजारावर जाते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नसले तरी यंदा जानेवारीपासून आत्तापर्यंत ४५ रुग्ण आढळले आहेत. तर चिकुनगुनियाचे आत्तापर्यंत बारा रुग्ण आढळले आहेत. अलिकडेच श्रमिक नगर भागात चिकुनगुनियाचे पाच रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.
समवेत फेाटो आर फोटोवर ११ राजेंद्र त्र्यंबके--सातपूर येथील श्रमिक नगर भागातील घरभेटीच्या दरम्यान जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत सूचना केल्या.