ूूपाटोदा : पाटोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र मांक १ व २ च्या वतीने दप्तरमुक्त शनिवार अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश होता. या आठवडे बाजारात विद्यार्थांनी सुमारे साडेचार हजार रु पयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फरसाण, किराणा सामान स्टेशनरी, कटलरी आदी वस्तूंची दुकाने थाटली होती.या आठवडे बाजारात माजी पंचायत समिती सभापती पुंडलिक पाचपुते, चंद्रभान नाईकवाडे, उस्मान शेख, तुकाराम पिंपरकर, जाफर पठाण सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, साहेबराव बोराडे, धोंडीराम शिंदे, दादा मोरे, नारायण पाचपुते, सुकदेव बांडे आदींसह पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या वेळी मुख्याध्यापक शिक्षक आदी उपस्थित होते.
बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार पाटोदा शाळेत उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:14 PM
ूूपाटोदा : पाटोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र मांक १ व २ च्या वतीने दप्तरमुक्त शनिवार अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देआठवडे बाजाराचे आयोजन