नाशिक : जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या प्रसुती कक्षाबाहेरुन एक वर्षाच्या गोंडस चिमुकलीला खांद्यावर टाकून पलायन करणारा अपहरणकर्ता मंगळवारी (दि.१६) पहाटे पोलिसांच्या ताब्यात आला. बाळाला घेत हा इसम पायी जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याने जात होता. यावेळी एका पोलीसाचे त्याच्याकडे लक्ष गेले असता त्यांनी त्या माणसाला हटकून थांबविले आणि विचारपुस केली. यावेळी गुन्हे शाखा युनीट-१चे गस्ती पथकही घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी चिमुकलीसह त्या संशयित इसमालाही ताब्यात घेतले.जिल्हा शासकिय रुग्णालयातुन शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती. यावेळी संशयित माणिक सुरेश काळे (४८,रा.शनीमंदिराजवळ फुलेनगर, पंचवटी) याने आईची नजर या चिमुकलीला उचलून पलायन केले होते. तीन दिवस काळे याने त्या चिमुकलीला आपल्या राहत्या घरात ठेवले होते. दरम्यान, चिमुकली गायब झाल्यापासून शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक चिमुकलीसह त्या अनोळखी अपहरण करणाऱ्या इसमाचा शोध घेत होते. शहरातील सर्वच परिसर आणि शक्यता असलेल्या विविध ठिकाण पोलिसांनी पिंजून काढले होते. इतकेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरसुध्दा तपासी पथके रवाना झाली होती; मात्र चिमुकलीला पलायन करणारा इसमाचा कोठेही मागमुस लागत नव्हता. यामुळे मुलीची आई आणि नातेवाईकांचीही चिंता पराकोटीला पोहचली होती. आईने सलग तीन दिवस जिल्हा रुग्णालयातच तळ ठोकून मोबाईलद्वारे चिमुकलीचा फोटो ये-जा करणाऱ्या नागरिकांना दाखवत ह्यमाझ्या मुलीला कोणी बघितले काह्ण असे विचारत होती.मुलगी दगावल्याने बालिकेचे केले अपहरणपोलिसांनी संशयित काळे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन महिन्यांपुर्वी त्याची स्वत:ची मुलगी मृत्युमुखी पडल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण केल्याचे कारण प्रथमदर्शनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, काळे याची सरकारवाडा पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचा पुर्वइतिहास तपासून फुलेनगर भागातील नागरिकांकडूनही त्याच्या वर्तणुकीबद्दलची माहिती गोळा केली जात आहे.
चिमुकली मातेच्या कुशीत : मुलीचा मृत्यु सहन न झाल्याने सिव्हिलमधून ‘त्या’ चिमुकलीला पळविल्याची दिली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 2:17 PM
जिल्हा शासकिय रुग्णालयातुन शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती. यावेळी संशयित माणिक सुरेश काळे (४८,रा.शनीमंदिराजवळ फुलेनगर, पंचवटी) याने आईची नजर या चिमुकलीला उचलून पलायन केले होते.
ठळक मुद्देबाळाला घेत हा इसम पायी रस्त्याने जात होता. मुलगी मृत्युमुखी पडल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण