शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

वारीसाठी निघालेला बाल सायकलिस्ट ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:22 AM

सिन्नर : नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीत सहभागी नऊवर्षीय सायकलिस्ट प्रेम सचिन निफाडे या बालकाच्या सायकलला पाठीमागून ट्रकने धडक ...

सिन्नर : नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीत सहभागी नऊवर्षीय सायकलिस्ट प्रेम सचिन निफाडे या बालकाच्या सायकलला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला. सिन्नर बायपासजवळ हॉटेल सर्वज्ञ समोर शुक्रवारी (दि. २८) सकाळी हा अपघात झाला.  नाशिक ते पंढरपूर या सायकल वारीचे आयोजन केले जाते. शुक्रवारी सकाळी निघालेल्या वारीत सुमारे ७०० सायकलपटू सहभागी झाले होते. नाशिकहून निघाल्यानंतर सायकल वारी सिन्नरजवळ बायपासला पोहचली असता नाशिककडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १४ एफटी ९७८९) सायकलवर जाणाºया प्रेम सचिन निफाडे (९) रा. नारायणबापू नगर, जेलरोड, नाशिकरोड यास पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डोके व छातीलाजोरदार मार लागल्याने प्रेम जागीच ठार झाला.नाशिकहून सुमारे ३० किलोमीटर सायकल वारी आल्यानंतर काळाने चिमुरड्या प्रेमवर घाला घातला. सिन्नर बायपासजवळ हॉटेल उडपी येथे सायकल वारीतील पोलीस अधिकारी हरिष बैजल, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सायकलिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खाबिया, मनीषा रौंदळ यांचे एकीकडे स्वागत होत असतानाच ही दुर्घटना घडली. त्यामुळे सायकल वारीवर शोककळा पसरली. अपघातानंतर प्रेमचे वडील सचिन निफाडे व त्यांच्या पत्नीला सहकाऱ्यांनी सावरले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, विनोद टिळे, शहाजी शिंदे यांच्यासह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.सिन्नर नगर परिषद रुग्णालयात शवविच्छेद केल्यानंतर मृतदेह नाशिकरोडकडे रवाना करण्यात आला. निफाडे कुटुंबीय व त्यांचे सहकारी नाशिकरोडकडे रवाना झाले. त्यानंतर सायकल वारी पंढरपूरकडे रवाना झाला. ट्रकचालक कृष्णा बबन राऊत रा. कणेरसर, ता. खेड, जि. पुणे याच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.‘प्रेम’चे सायकल  वारीचे दुसरे वर्षप्रेम सोबत सायकल वारीत त्याचे वडील व आई सहभागी झाले होते. प्रेमचे हे सायकल वारीचे दुसरे वर्ष होते. मयत प्रेम नारायणबापूनगर नाशिक येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसरी इयत्तेत शिक्षण घेत होता. शुक्रवारी पहाटे पंढरपूरकडे जाण्यासाठी तो लवकर तयार झाला होता. आई वडिलांसोबत नाशिक ते पंढरपूर प्रवास करण्यासाठी निघाल्यानंतर काळाने प्रेमवर घाला घातला.

 

 

टॅग्स :CyclingसायकलिंगAccidentअपघातNashikनाशिक