पंचवटी : मखमलाबाद शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षाच्या मुलाचा विहिरीत पाय घसरून कोसळल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सकाळी साडेदहाच्या वाजेच्या दरम्यान परिसरात असलेल्या पाण्याने भरलेल्या एका पडक्या विहिरीजवळून जात असताना पावसामुळे तयार झालेल्या चिखलामुळे तोल जाऊन पाय घसरल्याने थेट विहिरीत पडला पडला. भाऊ प्रशांत विहिरीत पडल्याचे दिसताच त्याच्या भावाने तत्काळ घराकडे धाव घेत घरच्यांना माहिती कळविली. त्यानंतर घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना कळविण्यात आली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, पोलीस हवालदार बाळा पारनकर, यांनी धाव घेत तत्काळ घटनास्थळी अिग्नशामक दल व जीव रक्षक दलास पाचारण केले. यावेळी अिग्नशामक दलाच्या जवानांनी जवळपास सात तासाच्या अथक प्रयत्नांनंतर तेरा वर्षीय प्रशांतचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मखमलाबाद शिवारातील मानकर मळा येथे राहणारा तेरावर्षीय प्रशांत भरतभाई भरवाड व त्याचाभाऊ असे दोघे जण रविवारी सकाळी गायी चारण्यासाठी पटांगणात गेले होते.
मखमलाबादला विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 1:38 AM
मखमलाबाद शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षाच्या मुलाचा विहिरीत पाय घसरून कोसळल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअपघात : पाय घसरल्याने तोल गेला