शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पलंगावरून खेळताना तोल गेल्याचे चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 4:31 PM

भाग्यश्री ही शांतीवैभव सोसायटीत सर्वांची लाडकी होती. हुशार तसेच खेळकर स्वभावाच्या भाग्यश्रीचा अशाप्रकारे अचानकपणे मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देइंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद सोसायटीत सर्वांची लाडकीसातत्याने बालकांच्या अपघाती मृत्यूच्या घटना

नाशिक : बालकांच्या अपघाती मृत्यूच्या घटना सातत्याने घडत असल्याने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनांमागे कुटुंबियांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आठवडाभरापुर्वीच डीजीपीनगर परिसरात एक वर्षाच्या बालकाचा टबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा वासनगर भागात पलंगावरून जमिनीवर कोसळल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वासननगर परिसरातील शांती वैभव सोसायटीत राहणाऱ्या हनुवटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील तीन वर्षांची चिमुकली भाग्यश्री ही पलंगावर खेळत असताना अचानकपणे तोल जाऊन जमिनीवर गुरूवारी (दि.५) पडली. यामुळे फरशीचा तीच्या डोक्यास गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत भाग्यश्रीला उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात कुटुंबीयांनी तत्काळ दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.आठवडभरापुर्वीच डीजीपीनगर-१च्या जवळ असलेल्या साई संतोषी मातानगर परिसरातील एका सोसायटीत चिमुकल्याचा बाथरूममध्ये पाण्याच्या टबमध्ये कलंडून पडून मृत्यू झाला होता. या घटनेने पुनरावृत्ती झाली. दोन महिन्यांपुर्वी विहितगावजवळील एका बंगल्याच्या आवारात असलेल्या भूमीगत पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.सोसायटीत सर्वांची लाडकीभाग्यश्री ही शांतीवैभव सोसायटीत सर्वांची लाडकी होती. हुशार तसेच खेळकर स्वभावाच्या भाग्यश्रीचा अशाप्रकारे अचानकपणे मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. भाग्यश्रीच्या अचानकपणे जाण्याने जणू या सोसायटीत भयाण शांतता पसरली होती.अवघा परिसर सुन्न झाला होता.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात