सुरगाणा : तालुक्यातील मनखेड येथील मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर तणाव निर्माण होऊन ग्रामस्थांनी येथील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मनखेड येथील १२ वर्षीय गौरव विलास गायकवाड यास शुक्र वारी (दि.०३)सकाळी साडेसातच्या दरम्यान सर्पदंश झाल्याने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोषकुमार आडे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सुरगाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविले. सुरगाणा येथे नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अकस्मित घटनेनंतर मनखेड येथे तणाव निर्माणझाला होता. मनखेड येथेच वेळेत उपचार झाले असते तर त्याचा मृत्यू झाला नसता,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती समजताच तहसीलदार विजय सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर, पोलिस उपनिरीक्षक बोडखे, बाºहे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेची शहानिशा करत डॉ. आडे यांच्या निलंबनाची कारवाई आठदहा दिवसात करण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनीग्रामस्थांनादिले. डॉ. आडे यांचे निलंबन व या आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांची बदली करावी अशी लेखी मागणी मृत्यू झालेल्या मुलाची आई सुनीता गायकवाड, सरपंच निर्मला कामडी, चिंतामण पवार, चिंतामण वार्डे, माधव चौधरी, जगन दिघे, नवसू पवार, पुंडलिक गायकवाड आदींसह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे यांच्याकडे केली आहे.मनखेड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोषकुमार आडे यांच्याबाबत अनेक नागरिकांनी गंभीर स्वरूपाच्या तक्र ारी केल्या आहेत. त्यांना आजपासूनच या आरोग्य केंद्रातून मुक्त करण्यात येत आहे. डॉ. आडे हे राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचे अधिकार मंत्रालयीन स्तरावरच आहेत. त्याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येईल.- डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. नाशिक.
मुलाचा सर्पदंशाने मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 6:01 PM
सुरगाणा : तालुक्यातील मनखेड येथील मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर तणाव निर्माण होऊन ग्रामस्थांनी येथील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देसुरगाणा : उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप