दिंडोरी : तालुक्यातील रवळगाव येथील दोन अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवीत फूस लावून पळून नेत त्यांचे लग्न लावण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या येवला तालुक्यातील वऱ्हाडी मंडळींचा डाव रवळगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी हाणून पाडत संबंधित वऱ्हाडी मंडळींची रवानगी थेट पोलीस स्टेशनमध्ये केली. याबाबतचे वृत्त असे की दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथील आदिवासी कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचे विवाह येवला तालुक्यातील सावरगाव कासारखेडे येथील युवकाशी लावण्याचा प्रकार रवळगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ टोंगारे व सोमनाथ निंबेकर यांनी हाणून पाडला. नवरदेवाच्या कुटुंबातील वीस जणांची रवानगी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे नेत त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी पोस्को आदींसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण कर्मचारी गायकवाड खांडवी चव्हाण करीत आहेत.
दिंडोरी तालुक्यात बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 12:47 PM