---------------------
सॅनिटरी पॅड वाटप करूनसामाजिक संदेश
सिन्नर : मकरसंक्रांत सणानिमित्त महिलांना हळदी कुंकवाचे वाण म्हणून सेफएव्हर संस्थेतर्फे सॅनिटरी पॅडचे वाटप करून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला. शहरातील उगले परिवारातील सेफएवर कंपनीच्या संचालक कल्याणी उगले, छाया उगले, मोनाली उगले, नीलम उगले यांनी घरी हळदी-कुंकवाचे वाण म्हणून सॅनिटरी पॅडचे वाटप केले. महिलांच्या आरोग्याच्या काळजीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
--------------------------
सिन्नर आगारात इंधन बचतीबाबत मार्गदर्शन
सिन्नर : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमात इंधन बचतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इंधन बचत केल्याने वाहनांची कार्यक्षमता वाढते व वेगावर नियंत्रण राहिल्याने अपघातांचे प्रमाण कमी होत असल्याचे प्रतिपादन आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी यावेळी केले. यावेळी एसटीचे विभागीय अधिकारी विजय झगडे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दत्ता शेळके, शामसुंदर झळके , सविता काळे, भरत शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
---------------------
वावी-घोटेवाडी रस्त्याची दुरवस्था
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील वावी ते घोटेवाडी या चार किलोेमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून डांबरी रस्ता अक्षरश: मातीचा झाला आहे. समृध्दी महामार्गाच्या कामामुळे या रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.