देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथील प.पू. कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट येथे बालसंस्कार शिबिर संपन्न झाले.नवीन पिढीमध्ये जैन धर्माच्या संस्कारांचे बीजारोपण व्हावे या उद्देशाने मुंबई येथील जैन युवा फेडरेशन व श्री कानजी स्वामी स्मारक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बालसंस्कार शिबिरात २५० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. दररोज रात्री वैराग्यशास्त्री यांची संगीतमय कथा झाली. या शिबिराचे आयोजन वीणा मोदी, उषाबेन कामदार, प्रभाकर कामदार, विनू जोबालिया, उल्हास जोबालिया यांनी केले. सात दिवस चाललेल्या या बालसंस्कार शिबिरात १० तास प्रात:पूजन, सामूहिक प्रार्थना, जिनेंद्र भक्ती व विविध जैन साधू-साध्वींची प्रवचने झाली. शिबिरामध्ये अनिल दहिसर, आशिष शास्त्री, अभिषेक शास्त्री, विवेक शास्त्री, देवांग शास्त्री, जितेंद्र शास्त्री, उर्विश शास्त्री, ब्र. चेतनाबेन, जिनल बेन आदींनी जैन धर्माचे संस्कार समजावून सांगितले.
देवळाली येथे बालसंस्कार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:19 AM