नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी नेहरूंच्या जीवनाविषयी माहिती दिली. याप्रसंगी के. एन. केंद्रे, बिन्नी वारघेसे आदी उपस्थित होते.रासबिहारी स्कूलरासबिहारी शाळेत बालदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी संगीत शिक्षिका श्रेयसी राय यांच्यासोबत गीतगायन केले. माध्यमिक विभागाच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘संस्कृत आणि मराठी स्तोत्र पठण’ स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण नाशिक वेद शाळेचे शिक्षक सारंग भार्गवे यांनी केले. यात शुभम पाडवी, सानिका शिरोडे, अस्मी गुजराथी, समृद्धी पाटील, ज्ञानेश्वरी देवरे, सुदीक्षा साळुंखे यांनी यश मिळविले.ठाकूर महाविद्यालयगोखले एज्युकेशन सोसायटी संचलित न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयात नेहरू जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी गोकुळ निंबाळकर व ऋ षिकेश चंद्रात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉक्टर संजय मांडवकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. प्रवीण कुमार पेंढारकर, डॉ. मनीष सोनवणे, प्रा. हेमा बुरुंग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीप सातभाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय मोरे यांनी केले.बिटको बॉइज शाळाडी. डी. बिटको बॉइज शाळा व ज्युनिअर महाविद्यालयात बाल दिन साजरा करण्यात आला. सकाळ सत्रामध्ये उपमुख्याध्यापक कांचन जोशी, पर्यवेक्षक सुभाष महाजन, अरुण महाजन, दिनेश जाधव यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तर दुपार सत्रामध्ये मुख्याध्यापक रेखा आर. काळे, उपमुख्याध्यापक जयश्री पेंढारकर यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्र माचे आयोजन व सूत्रसंचालन राजेंद्र गांगोडे यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक विनायक टाकळकर, बाळासाहेब बैरागी, लतिका गरुड उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा, लाखलगावजिल्हा परिषद शाळा लाखलगाव येथे बाल दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनावर भाषणे केली. विजया पगार यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक हिरामण बढे, नीता कदम, शीतल पगार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले, तर आभार नीता कदम यांनी मानले.वाल्मीकी टॉट्स शाळावाल्मीकी टॉट्स प्री-प्रायमरी आणि प्रायमरी शाळेमध्ये बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी आपल्या आवडीच्या गीतावर नृत्य सादर केले. त्यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धाचे आयोजन क रण्यात आले होते. यामध्ये मुलांनी प्लॅस्टिकला नाही म्हणा, सोल्जर, डॉक्टर इत्यादी प्रकारची वेशभूषा आणि फॅन्सी ड्रेस परिधान करून त्याविषयी माहिती दिली. यातील विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी संचालक सीमंतिनी कोकाटे, संस्थापक सीमा कोकाटे, मुख्याध्यापक मोनिका गोडबोले, यशोद आदी उपस्थित होते.वाघ युनिव्हर्सल शाळाके. के. वाघ युनिव्हर्सल शाळा, सरस्वतीनगर येथे बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कविता, नाटक, नृत्य, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन के ले होते. याप्रसंगी शाळेचे मार्गदर्शक ए. के. दीक्षित यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणाचा मनमुराद आनंद घ्यावा तसेच आपली नीतिमूल्ये जपण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी प्राचार्या अमृत राव उपस्थित होत्या.हिरे विद्यालयआदिवासी सेवा समिती संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय, सिडको शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सुनील इंगळे अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून पंडित नेहरू यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक वाल्मीक ठाकरे, पर्यवेक्षक दिलीप देसले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश अहिरे व आभार मंगला खैरनार यांनी मानले.
बच्चे मन के सच्चे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:17 AM