शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

मुले पळविणारी टोळीची ‘सोशल’ दहशत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:49 AM

नाशिक : मुले पळविल्याचा संशयावरून धुळे जिल्ह्यात ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारी घडली़, तर तीन दिवसांपूर्वी याच कारणावरून नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून इनोव्हा जाळून टाकली़ सोशल मीडियावर मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवरून मराठवाड्यातही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत़ सोशल मीडियावरील ‘व्हॉट्स-अ‍ॅप’वर व्हायरल झालेले व्हिडीओ, या अफवांना कर्णोपकर्णी विशेषत: खेड्यांमध्ये मिळणारा प्रतिसाद यामुळे या घटना घडत आहेत़

ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यात अफवा व्हिडीओ व्हायरल; कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती

विजय मोरे ।नाशिक : मुले पळविल्याचा संशयावरून धुळे जिल्ह्यात ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारी घडली़, तर तीन दिवसांपूर्वी याच कारणावरून नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून इनोव्हा जाळून टाकली़ सोशल मीडियावर मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवरून मराठवाड्यातही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत़ सोशल मीडियावरील ‘व्हॉट्स-अ‍ॅप’वर व्हायरल झालेले व्हिडीओ, या अफवांना कर्णोपकर्णी विशेषत: खेड्यांमध्ये मिळणारा प्रतिसाद यामुळे या घटना घडत आहेत़ धुळे जिल्'ात जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्ती या सोशल दहशतीच्या बळी ठरल्या असून, नाशिक शहर व जिल्'ातही हे अफवेचे लोन वेगाने पसरत चालले आहे़धुळे जिल्'ाच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारी टोळी असल्याची अफवा कर्णोपकर्णी पसरली होती़ बाजाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या सोलापूरमधील पाच जणांना राइनपाड्यातील ग्रामस्थांनी अक्षरश: ठेचून मारून माणुसकीलाच काळिमा फासला़ नंदुरबारच्या म्हसावदमध्ये मुले पळविणारी टोळी असल्याच्याच संशयावरून तिघांना बेदम मारहाण करून त्यांची इनोव्हा कार जाळली़, तर मराठवाड्यातही संशयावरून मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ गत अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरून या टोळीबाबतचा संदेश व्हायरल केले जात आहेत़ विशेष म्हणजे मुलांची काळजी घेण्याबरोबरच हा व्हिडीओ व्हायरल करण्याचे आवाहन केले जाते़ साधारणत: मुलांच्या काळजीपोटी हे मेसेज फॉरवर्ड केले जात असले तरी त्याचे दुष्परिणाम या घटनांमुळे समोर आले आहेत़ मुले पळविणारी टोळी अशी समजूत करून घेत ग्रामस्थ अक्षरश: जीव जाईपर्यंत मारहाण करून कायदा हातात घेत असल्याची परिस्थिती आहे़ संबंधित संशयिताला पकडून पोलिसांच्या हवाली करणे अपेक्षित असताना मारून टाकण्यासारख्या घटना घडत आहेत़ या प्रकारच्या सर्वाधिक घटनांचे लोन हे खेड्यापाड्यातील आठवडे बाजारांमध्ये प्रामुख्याने परसत आहे़. विशेष म्हणजे पोलिसांनाही मारहाण केली जाते या अफवांचे लोन आता खेड्यानंतर शहरातही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरते आहे़ या अफवांबाबत पोलीस व शासनाच्या विविध यंत्रणांनी जनजागृती करणे गरजेचे आहे, अन्यथा राईनपाडा व म्हसावदसारख्या आणखी काही घटना घडण्याची शक्यता आहे़.सोशल मीडियावर दाम्पत्याचे फोटो व्हायरलसोशल मीडियावरील विशेषत: व्हॉट््सअ‍ॅपद्वारे एका दाम्पत्याचा फोटो व्हायरल केला जातो आहे़ या फोटोच्या खाली हे दाम्पत्य लहान मुलांना पळवून नेत असून, प्रारंभी भाडेतत्त्वावर घर घेतात, प्रेमसंबंध निर्माण करतात व हळूच घरातील लहान मुलांना पळवून नेऊन विकतात़ या फोटोतील दाम्पत्यापासून सावध रहा, अशा आशयाचे सूचना असतात़ विशेष म्हणजे संबंधित मेसेज फॉरवर्ड करणाºयास सत्यतेबाबत विचारणा केली असता तो कॅज्युअली एका ग्रुपवरून आला आणि सुरक्षितता म्हणून फॉरवर्ड केला, असे सांगितले जाते़. कायदा हातात घेण्याची प्रवृत्तीपालकांच्या दृष्टिकोनातून लहान मुलांचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा असतो़ सोशल मीडियावरील या व्हायरल संदेशांमुळे त्यांच्या जागरुकतेऐवजी भीतीच अधिक वाढते़ खेड्यापाड्यात तर अशा प्रकारच्या अफवा कर्णोपकर्णी सर्वाधिक वेगाने पोहोचतात़ त्यातच गावात वा बाजारात एखादा अनोळखी व्यक्ती आली की नागरिक मुले पळविणारा म्हणून त्याच्या पाठीमागे लागतात,तर जिवाच्या भीतीने तिही व्यक्ती पळते व गैरसमजातून त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली जाते़ नागरिकांनी अशाप्रसंगी कायदा हातात न घेता गावचा पोलीस पाटील वा जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देणे गरजचे आहे़मुलं पळविणारी टोळी ही अफवा असून, नागरिकांनी यास बळी पडू नये़ विशेषत: खेड्या-पाड्यातील आठवडे बाजारात या अफवा सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल होत आहेत़ बाजारात वा गर्दीच्या ठिकाणी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, कायदा हातात घेऊ नये़ अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल़ या अफवांचे लोन खेडोपाडी पसरू नये यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाºयांना पोलीसपाटील यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्याबाबत सांगितले आहे़- संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण(फोटो : आर / फोटो / ०१ संजय दराडे या नावाने सेव्ह केला आहे़ )अफवा पसरवू नका; पोलिसांना कळवासोशल मीडियावरील मुले पळविणाºया टोळीबाबतचा कोणताही व्हिडीओ वा संदेश व्हायरल करून अफवा पसरवून नये़ या प्रकारच्या अफवा पसरविणाºयांवर लक्ष ठेवण्याबाबत सायबर शाखेला सांगण्यात आले आहे़ त्यामुळे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अशाप्रकारचे अफवा पसरवू नका़ संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्या़- डॉ.रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक (फोटो : आर / फोटो / ०१ रवींद्र सिंगल या नावाने सेव्ह केला आहे़)४२ सेंकदांचा व्हायरल व्हिडीओ संदेशतामिळनाडू पुलीस को एक कंटेनर से बच्चो की लाश मिली है। इन बच्चो के जिस्म का अंदर का हिस्सा निकाला गया है, जैसे किडनी, लिव्हर। तामिळनाडू पुलीसने बताया, इन सारे बच्चो को अलग-अलग देशोंसे किडनॅप करके लाया गया है। अपने घर के बच्चो को संभालो, उनका खयाल रखो। अपने सारे गु्रप मे ये मेसेज सेंड करो, इसको इतना फैलाव के किडनॅपर पकडने चाहीये, अगर जिसने य नही फैलाया वो अपनी मा का सपूत नही। अशाप्रकारचे काळजी घेण्याचे व भावनिक आवाहन करणारे तसेच व्हिडीओ व्हाट््सअ‍ॅपवरून व्हायरल करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे़सिग्नलवरील भिक्षेकरी मुलांबाबत संशयलहान मुलांना पळवून आणून अपंग केल्यानंतर भिकेला लावले जात असल्याची समजूतही नागरिकांमध्ये आहे़ मुलांप्रती जागरूक असलेल्या नागरिक सिग्नलवरील भिक्षेकरी वा विविध वस्तुंची विक्री करणाºया लहान मुलांकडे नेहमीच संशयाने बघतात़ काही दिवसांपूर्वीच न्यायालयाच्या आदेशाने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरात मोहीम राबवून सुमारे १६५ भिक्षेकरी व लहान मुलांना पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल केले होते़