त्र्यंबकेश्वर : नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सायंकाळी साडेचार ते पावणे पाच सुमारास खंबाळे फाट्यावर रस्ता ओलांडतांना नाशिकहून त्र्यंबक कडे येणार्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत अविनाश संजय कचरे वय 8 वर्षे रा.खंबाळे या बालकाचा जागीच मृत्यु झाला.या बाबत समजलेली माहिती अशी की खंबाळे येथील कचरे कुटुंबिय आज हनुमान जयंती निमित्त अंजनेरी येथे श्री हनुमान दर्शनार्थ गेले होते. ते दर्शन करुन सायंकाळी सव्वाचार वाजता खंबाळे फाट्यावर उतरले.फाट्यावर उतरल्या नंतर ते व अन्य लोक आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असतांना बालकाला धडक दिली. चालकाने गाडी उभी करुन मृत (जिवंत आहे असे समजून) बालकाला त्याच्या नातेवाईकांसह त्र्यंबकेश्वर येथे आणले. मात्र त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्याऐवजी डॉ. रोहीत शेजवळ यांच्या खाजगी दवाखान्यात नेले. बालकाच्या आईला कार चालक म्हणाला तुम्ही डॉक्टरला दाखवा मी गाडी लावतो आणि गाडी लावण्याच्या बहाण्याने चालक कार सह फरार झाला. दुर्दैवाने कारचा नंबर कोणीच घेऊ शकले नाही. पोलीसांनी प्रथम अपघाताची व अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. सायंकाळी 7.00 च्या दरम्यान खंबाळे येथील व अन्य नातेवाईकांनी जोपर्यंत फरार चालक व कारचा शोध लाऊन ताब्यात घेत नाहीत तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. मूलाचे नातेवाईक व इतर लोकांनी प्रक्षुब्ध होऊन ग्रामीण रुग्णालयात मोडतोड केली . डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको केला. वाहनांची रांग लागली होती. (वार्ताहर)
नाशिक त्र्यंबक रस्त्यावर कारच्या धडकेत बालक ठार : ग्रामीण रुग्णालयात मोडतोड
By admin | Published: April 11, 2017 10:08 PM