नाशिक : सध्या संपूर्ण जगावर तंत्रज्ञानाचे वर्चस्व असून, यामुळे मुलांचे बालपण हरवते आहे, गॅझेट्समुळे त्यांच्यातील कलाविष्कार हरवत चालला असल्याच्या चर्चांना दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छेद दिला आहे. विद्यार्थी आजही तितकेच सृजनशील असल्याचे त्यांनी कथासंग्रहाच्या माध्यमातून सिद्ध केला असल्याचे प्रतिपादन कादंबरीकार पूजा प्रसून यांनी केले.दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वत: लिहिलेल्या १८ प्रेरणादायी कथांचा संग्रह असलेल्या ‘बाय द मिस्टी हिल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कुसमाग्रज स्मारकात नुकताच पार पडला. यावेळी प्रसून बोलत होत्या. यावेळी त्यांनी बोलताना पॉडकास्टच्या माध्यमातून मुलांना संधी दिली जाईल, असे सांगितले. तसेच आमच्या काळात अशी संधी मिळाली नाही, असा सोहळा शहरात प्रथमच बघत असल्याचेही त्या म्हणाल्या तसेच नाशिककरांसाठी हा कथासंग्रह अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी शिक्षण सहसंचालक नितीन बच्छाव, विनायक रानडे, संतोष हुदलीकर, संदीप युनिव्हर्सिटीच्या प्रा. डॉ. मोहिनी गुरव, समुपदेशक शंतनू गुणे, प्रवीण मानकर, स्तंभलेखक एन. सी. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया आणि प्राचार्य पुष्पी दत्त यांनी स्वागत केले.तर विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेतून कागदावर उतरलेल्या या कथा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील. प्रत्येकाच्या मनाला त्या निश्चितच भावतील, असा आशावाद राजघरिया यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन वैजयंती दारेकर आणि आदिती राणे यांनी केले.
मुलांची सृजनशक्ती बालमनासाठी गरजेची: पूजा प्रसून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 1:15 AM
सध्या संपूर्ण जगावर तंत्रज्ञानाचे वर्चस्व असून, यामुळे मुलांचे बालपण हरवते आहे, गॅझेट्समुळे त्यांच्यातील कलाविष्कार हरवत चालला असल्याच्या चर्चांना दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छेद दिला आहे. विद्यार्थी आजही तितकेच सृजनशील असल्याचे त्यांनी कथासंग्रहाच्या माध्यमातून सिद्ध केला असल्याचे प्रतिपादन कादंबरीकार पूजा प्रसून यांनी केले.
ठळक मुद्दे ‘बाय द मिस्टी हिल’ कथासंग्रहाचे प्रकाशन