सटाणा : शहरातील नामपूर रस्त्यावरील दोधेश्वर नाक्यावर अल्टो कार आणि पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका अकरा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला, तर शहरातील सुभाषरोड नंबर ३ मधील रहिवासी देवरे दांपत्यांसह त्यांची दोन मुले या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि.२३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. सटाणा शहरात सुभाषरोड नंबर ३ येथे वास्तव्यास असणारे देवरे कुटुंबीय चौगाव येथील आपली नातलग साक्षी संजय शेवाळे (११) हिलाही सोबत घेऊन खिरमाणे येथे एका कार्यक्र माला गेले होते. कार्यक्रम आटोपून सटाण्याकडे परतत असताना त्यांच्या अल्टो कारला भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने या अपघातात साक्षी शेवाळे हिचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंद नानाजी देवरे, योगीता गोविंद देवरे हे दांपत्य व त्यांची दोन मुले आरु षी आणि आरु ष गंभीर जखमी झाले आहे. जखमींना सटाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. सटाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पिकअप चालकासह ताब्यात घेतली आहे.
नामपूर रस्त्यावरील दोधेश्वर नाक्यावर अपघातात बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:59 AM