शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

चावी गिळल्याने बालकाचा मृत्यू

By admin | Published: November 17, 2016 11:35 PM

चावी गिळल्याने बालकाचा मृत्यू

 मालेगाव : बालकाचे नेत्रदान करून जाधव परिवाराने ठेवला समाजासमोर आदर्शसंगमेश्वर : खेळण्यातील गाडीची चावी गिळल्याने चारवर्षीय बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी मालेगाव शहरात घडली. या गंभीर परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जोपासत जाधव परिवाराने नेत्रदानाचा निर्णय घेतला. नेत्रदानाच्या प्रक्रियेनंतर शोकाकुल वातावरणात बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालेगाव शहरातील भाऊसाहेब जाधव हे सटाणा नाका भागातील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. बुधवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा अनंत (४) हा आपल्या भावंडांबरोबर खेळत होता. खेळण्यातील छोट्या गाडीची चावी त्याने तोंडात धरली. ती अनावधानाने गिळली गेली. ती चावी श्वासनलिकेत अडकल्याने त्याला श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्याने त्याने स्वयंपाकगृहात काम करीत असलेल्या आईकडे धाव घेतली. त्याच्या आईने व इतर भावडांनी गिळालेली वस्तू काढण्याचा प्रयत्न केला व तत्काळ शहरातील डॉक्टरांकडे धाव घेतली; मात्र गिळलेली चावी श्वासनलिकेत अडकल्याने त्याला श्वास घेण्यास खूपच अडचण येऊ लागली. त्यातच त्याचा उपचारापूर्वी गुदमरून मृत्यू झाला. अनंतच्या मृत्यूने जाधव परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही जाधव परिवाराने आपल्या लाडक्याचे नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्याचे दोन्ही नेत्र रोटरी आय हॉस्पिटलकडे दान करण्यात आले. रात्री साडेबारा वाजता शोकाकुल वातावरणात मुंगसे, ता. मालेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.भाऊसाहेब जाधव यांना पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा अनंत हा येथील युरो किड्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ज्युनिअर के.जी.च्या वर्गात शिकत होता. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत बालकाचा जन्म चतुर्थीला झाला होता व त्याचा मृत्यूही चतुर्थीच्या आदल्या दिवशीच  झाला. (वार्ताहर)